पोलिस स्थापना दिनानिमित्त कुंडलवाडीत पोलिसांचा सन्मान

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील के.रामलु नाबाद वाट्सअप ग्रुपच्या वतीने 60 व्या पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरातील पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी तैनात बेग, महेश माकुरवार, रामराव आडे, नजीर शेख, गणेश गंधकवाड आदी कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पोलीस स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहरध्यक्ष तथा पत्रकार अमरनाथ कांबळे, तैनात बेग, गणेश गंधकवाड, रामराव आडे यांनी पोलीस दिनानिमित्य मनोगत व्यक्त केले आहे. तर सोसायटीचे प्रभारी चेअरमन काशिनाथ नरावाड, साईनाथ शेट्टीवार, शिवाजी कोनेरवार, सयाराम मुकेरवार, चंद्रगुप्त कुंडलवाडीकर, श्याम उत्तरवार, लक्ष्मीकांत येपुरवार, यशवंत मुंनगीलवार, पत्रकार कुणाल पवारे, सिद्धार्थ कांबळे, मुकेश जोशी, प्रशांत पांडे, भूषण कोलंबरे, अनिल पेंटावार,शिवा खांडरे, दत्तू हामंद, गौतम वाघमारे, आदीसह मोठ्या प्रमाणात गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष शिवशेट्टे यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या