जि.प. प्राथमिक शाळा चिरली कडून नवनिर्वाचित पोलीस पाटलांचा सत्कार

[ कुंडलवाडी वार्ताहर – अमरनाथ कांबळे ]
कुंडलवाडी पासून जवळ अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडल्यानंतर लगेचच एका कार्यक्रमात चिरली येथील सौ. शुभांगी संजय पाटील ढगे यांची नुकतेच चिरली चे पोलीस पाटील पदी निवड झाल्याने तर टाकळी येथील शरद चांदराव मेहरकर यांची टाकळी येथे पोलीस पाटील पदी निवड झाल्याने शाळेतर्फे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एन.एस.दमकोंडवार (दरबस्तेवार)व शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष केशव पाटील बोमले यांनी या दोन्ही पोलिस पाटलांचे शाल व पुष्पहार देऊन गावकऱ्यांसमोर यथोचित सत्कार केला.
यावेळी चिरली टाकळी गट ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. जोत्सना शरद मेहरकर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशव पाटील बोंमले ,उपाध्यक्षा सौ. क्रांती शिलानंद कैवारे यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एन.एस.दमकोंडवार (दरबस्तेवार), सह शिक्षक रविंद्र दावलेकर,सहशिक्षिका सौ.कौसर शेख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या