दौलापूर गावच्या पोलीस पाटील पदी ज्योती देगाव यांची निवड !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
             बिलोली तालुक्यातील मोजे दौलापूर या गावच्या पोलीस पाटील पदी ज्योती संतोष देगावे यांची निवड झाल्याची निवड यादी उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी जाहीर केले आहे…
       बिलोली तालुक्यातील सर्व गावच्या पोलीस पाटील पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. सदरील निवड प्रक्रियेत दौलापूर गावचे पोलीस पाटील पद हे आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव होते, या पदासाठी गावातून एकूण सहा अर्ज दाखल करण्यात आले होते, त्यापैकी पाच उमेदवार हे लेखी परीक्षेत अपात्र झाले तर फक्त एकमेव उमेदवार ज्योती संतोष देगावे हे मुलाखतीसाठी पात्र झाल्या त्यामुळे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी ज्योती देगावे यांची मुलाखत घेऊन दौलापूर गावच्या पोलीस पाटील पदी ज्योती संतोष देगावे यांची गुनानुक्रमे निवड करण्यात आल्याची निवड यादी जाहीर केले आहे.
             त्यांच्या निवडीबद्दल शिवाजी पाटील देगावे,आनंदराव पाटील मोरे,गंगाधर मुंडकर,सुधाकर पाटील भोसले, रामू सुरोडवार,शेख गौस,पांडुरंग पाटील देगावे,आदीसह गावातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या