ममदापूर गावच्या पोलीस पाटील पदी संतोष शिवशेट्टे यांची निवड !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
             बिलोली तालुक्यातील मोजे ममदापूर या गावच्या पोलीस पाटील पदी संतोष पिराजी शिवशेट्टे यांची निवड झाल्याची निवड यादी उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी जाहीर केले आहे.
       बिलोली तालुक्यातील सर्वच गावच्या पोलीस पाटील पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. सदरील निवड प्रक्रियेत ममदापूर गावचे पोलीस पाटील पद हे इतर मागास मागास प्रवर्ग सर्वसाधारण साठी राखीव होते, या पदासाठी गावातून एकूण 18अर्ज दाखल करण्यात आले होते, त्यापैकी फक्त 6उमेदवार हे लेखी परीक्षेत अपात्र झाले.तदनंतर या 6 उमेदवारांचे मुलाखती उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी घेऊन गुणानुक्रमे संतोष पिराजी शिवशेट्टे यांची ममदापुर गावच्या पोलीस पाटील पदी निवड झाल्याची निवड यादी जाहीर केले आहे.
            या निवडी बद्दल शंकर पाटील शिवशट्टे ग्रामपंचायत सदस्य, उमाकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य, नागनाथ माली पाटील, बाबू पाटील शिवशेट्टे, शिवां पाटील शिवशट्टे माजी उपसरपंच, बाबू शिक्राप्पा पाटील, सयाराम निदाने माजी उपसरपंच, संतोष हनुमंतराव पाटील, सूर्यकांत शंकरराव पाटील, लक्ष्मण ईश्वरा पाटील, मारुती माधवराव पाटील, संभाजी पाटील शिवशट्टे, कैलास पाटील शिवशट्टे, मारुती संगमनाथ पाटील, मारुती प्रल्हाद पाटील शिवशट्टे, हानमंत पाटील गाडले, इरवंत पाटील भंडरपल्ले, साईनाथ पाटील शिवशेट्टे,आदीसह मोठ्या प्रमाणात गावातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या