पोलीस ठाणे लोहा तर्फे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांचे नागरिकांना आवाहन !

(विशेष प्रतिनिधि – रियाज पठान)

लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपली कोणतीही मालमत्ता आपण कष्ठाने कमावलेली आहे परंतु समाजातील काही सराईत गुन्हेगार हे चोरी, घरफोडी, फसवणूक असे मालमत्तेचे गुन्हे करतात.
तसेच इतरही मालमत्तेचे गुन्हे होत असतात. सदर गुन्हे घडल्यानंतर आरोपी शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाचे कसोशीने प्रयत्न सुरू असतात आणि सुरूच राहतील.
गुन्हेगार हे वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे करीत असतात म्हणून आपण स्वतःच्या मालमत्तेची काळजी कशी घ्यावी यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
1. रात्री झोपताना दरवाजा उघडा ठेऊन झोपू नये..
2. मोटर सायकल ला लोखंडी साखळीचे लॉक लावावे ..
3. प्रवेश दाराच्या कडीला कुलूप लावून ठेवावे जेणे करुन एखाद्या शेजारच्या घरात चोर शिरताना आजू बाजूच्या घरांच्या बाहेरून कड्या लावू शकणार नाही व त्यामुळे शेजारी काही आरडाओरड झाल्यास तात्काळ बाहेर येऊन मदत देता येईल.
4. ज्यांना शक्य आहे त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावे .
5. ग्रामीण भागातील पोलिस पाटील, सरपंच , उपसरपंच व तरुण मुलांनी पुढाकार घेऊन ग्राम सुरक्षादल स्थापन करावे तसेच एक व्हॉट्स ग्रुप बनवावा त्यामुळे लहान मोठया काही घटना घडल्यास तात्काळ इतरांना माहिती मिळेल.
6. शहरी भागात व्यापाऱ्यांनी CCTV कॅमेरे बसवावेत तसेच 8 ते 10 दुकानात मिळून एक सुरक्षा रक्षक नेमावा.
7. शहरी भागात नगरसेवक यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक मोहल्ला व गल्लीमध्ये प्रवेशाच्या जागी Cctv बसवावेत. तसेच प्रत्येकाने आपल्या घरासमोरील रात्री लाईट्स चालू ठेवून प्रकाश राहील याची काळजी घ्यावी.
8.गावाला जाताना शेजारच्या लोकांना माहिती देऊन जावे व एकमेकांचे फोन नंबर्स माहित असावेत
9. घरात जास्त रोख रक्कम किंवा सोन्याचे दागिने ठेवू नये तसेच अंगावर जास्त दागिने घालू नयेत, ते बँकेत लॉकर्स मध्ये ठेवावेत
10.दिवसा अनोळखी व्यक्ती गावात फिरताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
11. एखाद्या अनोळखी व्यक्तीने पैसे दागिने जवळचे काढून त्यांच्याकडे मागितल्यास अथवा बॅगमध्ये ठेवण्यास सांगितल्यास असे न करता आपले आसपासचे लोकांना ओरडून अशा लोकांची माहिती द्यावी.
12. आपला ATM कार्डचा, कार्ड नंबर, पिन नंबर अथवा CVV नंबर कोणत्याही परिस्थितीत कोणालाही देऊ नये.
13. सर्व शेत वस्त्यांवरील लोकांनी आपल्या बीट अंमलदार तसेच गावातील प्रमुख लोकांचे शेजारी वस्तीवरील लोकांचे मोबाइल नंबर्स आपल्याकडे ठेवावेत जेणेकरून काही घटना घडल्यास आपल्याला तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क करता येईल.
14.नागरिकांनी कोणताही आर्थिक व्यवहार किंवा ईतर खरेदी विक्री मधून मिळालेली मोठी रक्कम घरात न ठेवता लवकरात लवकर बँकेत जमा करावी.
सर्व नागरिकांनी सतर्क राहून आपल्या मौल्यवान वस्तूंची व त्याहूनही मौल्यवान म्हणजे आपल्या जीवनाची सुरक्षा करावी.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या