आपली सकारात्मक विचार सरणी हीच आपल्या यशाचे गमक असेल – डॉ.कमलकिशोर काकाणी

[ विशेष प्रतिनिधी – गोविंद बिरकुरे ]
सध्याच युग हे स्पर्धेचे युग असले तरी बदलणाऱ्या स्थित्यंतराशी आपण सकारात्मक जुळवाजुळव केली तर आपण यशस्ववाचे कोणतेही शिखर पार करु शकतो. असे प्रतिपादन पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना धर्माबाद शिक्षण संस्थेचे सचिव मा.डॉ.कमलकिशोर काकाणी यांनी केले आहे. 
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथील २४ व्या दिक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले सावकार जसा मालाची साॅर्टींग करुन खणखणीत मालाला भाव देतो. तसे खणखणीत तुम्ही झालात तर या स्पर्धेत तुम्हालाही यथायोग्य भाव मिळेल असे ते आपल्या मौलिक मार्गदर्शनात म्हणाले.
या कार्याक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. गंगाधर सेठ गुजराथी उपाध्यक्ष (धर्माबाद शिक्षण संस्था) तर प्रमुख पाहुणे म्हणून नागनाथ नोमूलवार हे उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी.सुशिला यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप मा.गंगाधर सेठ गुजराथी यांनी केले.पदवीदान समारंभाचे प्रास्ताविक परीक्षा प्रमुख डॉ. सुनिलचंद्र सोनकांबळे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. एस.एस. क्षेत्री तर आभार प्रदर्शन प्रा.राम शेवलीकर यांनी केले. सदरील कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व नियमित तसेच माजी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या