माजी आमदार रामभाऊ गुंडीले यांचा फोटो असलेल्या टपाल तिकीटाचे प्रकाशन!

मुंबई-  दि.04/11/2020

मुंबई गिरगाव या मुख्य पोष्ट ऑफिसच्या वतीने
मा.आ. रामभाऊ गुंडीले यांचा फोटो असलेल्या पांच रुपये किमंती च्या टपाल तिकीटाचे (My tickets) प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी पोष्ट मास्तर मा.संजय सोरटे साहेब व त्यांचा सर्व स्टाॅफ हजर होता.या प्रसंगी मा.आ.रामभाऊ गुंडीले यांनी अत्यंत समयोचित असे मार्ग दर्शन करुन भारतातले पोष्ट ऑफिस म्हणजे व्यवस्था पनातील तंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण असून भारतातला पोष्टमॅन हा जगातील पहिला गुगल आहे असे नमुद केले.

याप्रसंगी रामभाऊ गुंडीले यांचे इंडिया पोष्ट पेमेंट बँक अकाउंट ओपन करण्यात आले.याप्रसंगी दिनानाथ साळुंके व प्रभू हेही हजर होते.

ताज्या बातम्या