को.ए.सो.प्रभाकर नारायण पाटील काळसुरी माध्यमिक शाळा,म्हसळा या शाळेचा नवोपक्रम.
(रायगड /म्हसळा ता.प्रतिनिधी-प्रा.अंगद कांबळे)
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था(DIET) पनवेल, रायगड यांनी घेतलेल्या नवोपक्रम science concept या मध्ये म्हसळा तालुक्यातील को.ए.सो प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळा, काळसुरी म्हसळा या शाळेचा नवोपक्रम science concept या मध्येसहभाग नोंदवून जिल्ह्यात चौथा क्रमांक घेऊन यशस्वी झाले आहेत.
नवोपक्रमामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी,उत्कृष्ट असे मार्गदर्शक – श्री किरण चाळके सर, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शाळेतील सहकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समस्त कालसूरी ग्रामस्थांनी हार्दिक अभिनंदन केल गेल आहे.