नायगाव येथील कै.गणपती सोनकांबळे यांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे दोन लाख मिळाले !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
मृत्यू पावलेल्या गणपत गुणाजी सोनकांबळे यांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत दोन लाखांचा संरक्षण कवच दि.२३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक नायगाव येथे वारसदाराच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक एस.व्ही.जाधव यांनी दिली.
 केंद्र सरकारने सर्व स्तरातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू केली असून जो कोणताही भारतीय नागरिक वार्षिक ३३० रुपयांच्या प्रीमियमवर खरेदी केल्यानंतर विमा पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकाचा १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान मृत्यू झाल्यास या योजनेंतर्गत सरकारकडून २ लाख रुपयांची रक्कम पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला दिली जाते. 
 त्या अनुषंगाने नायगाव येथील गणपत गुणाजी सोनकांबळे यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँक नायगाव येथे स्वताचे खाते उघडून वार्षिक ३३० रुपयांची पॉलिसी खरेदी केली होती परंतु गणपत सोनकांबळे यांचा दि.१५ सप्टेंबर रोजी वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत मयत प्रमाणपत्र व फॉर्म भरून या पॉलिसीचा लाभ मिळवा यासाठी अर्ज दाखल केले असता दि.२३ सप्टेंबर रोजी नायगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक नायगाव येथे वारसदार रंजना गणपत सोनकांबळे यांच्या खात्यात दोन लाखांची रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक सचिन व्यंकटराव जाधव यांनी दिली.
यावेळी शाखा व्यवस्थापक सचिन व्यंकटराव जाधव,अफिसर गोपाल खडसे,काॅशियर श्रीकांत सिताव, सतिश माळगे संजय कांबळे सह आदींची उपस्थिती होते. अडचणीच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांना वेळेत आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या