प्रहार दिव्यांग क्रांती संघटना अध्यक्षपदी साईनाथ पाटील तर सचिवपदी नारायण सोनटक्के!
(धर्माबाद ता.प्रतिनिधी-नारायण सोनटक्के)
धर्माबाद तालुक्यातील प्रहार अंपग सघंटनेच्या अध्यक्षपदी साईनाथ जक्कोजी पाटील जुन्निकर तर सचिवपदी नारायण गोविंद सोनटक्के यांची सर्वानुमते रविवारी दुपारी 12:30 वाजता बिनविरोध निवड करण्यात आली असून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
धर्माबाद येथील शासकीय विश्रामगृहावरच्या बाजूला वडगावकर यांच्या आडत दुकानात प्रहार संघटने तर्फ सर्व धर्माबाद तालुकास्तरीय व शहरी भागातील सर्व दिव्यांग व्यक्तींची बैठक माजी तालुकाध्यक्ष बळीराम पाटील सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या वेळी प्रमुख उपस्थिती पंढरीनाथ हुंडेकर पाटील (प.जि.अध्यक्ष),मारोती मंगरुळे (जि.सचिव) व गणेश हांडे प्रहार जनशक्ति पक्षाच जिल्हा संपर्क प्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदरील बैठकीत धर्माबाद प्रहार अपंग तालुका संघटना व शहर संघटनेची नुतन कार्यकारिणी बिनविरोध जाहीर करण्यात आली.
गणेश हांडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सर्वांना मनापासुन हार्दीक शुभेच्छा ही दिल्या.
“कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर केली आहे.”
साईनाथ जक्कोजी पाटील जुन्निकर-( ता.अध्यक्ष ),
साहेबराव विठ्ठलराव भुतावळे -( ता.उपाध्यक्ष ),
नारायण गोविंदराव सोनटक्के-( ता.सचिव ),
बलिराम लालू सूर्यवंशी-( ता.कोषाध्यक्ष ),
जीवन आंबाजी चव्हाण-( ता.सहसचिव )
सावित्राबाई बोलचटवार-( महिला उपाध्यक्ष )
माधव गंगाधर पांचाळ-( जारिकोट सर्कल उपाध्यक्ष )
पोशटी मदनुरे, शिरीष खोड – ( उपाध्यक्ष )
●धर्माबाद प्रहार संघटना शहर कार्यकारिणी ●
श्रीयाल विठ्ठलराव गोस्कुलवाड-( शहर अध्यक्ष )
सय्यद जाकीर मुक्रम-( शहर उपाध्यक्ष )
शिवराज पोशट्टी बंगरवार-( शहर सचिव )
गजेंद्र रामकिशन यमेकर-( शहर कोषाध्यक्ष )
यलया आलया बिपटवार-( शहर सहसचिव )
मोहन सायलू उशलवार-( शहर संघटक )
चीनना गंगाराम गोस्कुलवार-( शहर सदस्य )
शंकरराव चातरवाड-( शहर सदस्य )
प्रकाश दिगंबर भिसे-( शहर सदस्य )
हणमंत जयवंत गिरी-( शहर सदस्य )
राजू कनचेलू-(शहर सदस्य ) इत्यादी...
अध्यक्ष साईनाथ जक्कोजी पाटील जुन्निकर यांनी आलेल्या सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व नविन पदाधिकाऱ्यांचे मनस्वी आभार व्यक्त केले.