दिनांक 09/01/2022 रविवारी रोजी आदरणीय राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली मा.मंगनाळे विठ्ठलराव (प्रहार दिव्यांग क्रांती संघटना प्रमुख) नांदेडच्या आदेशाने मौजे बाचेगाव, पांगरी राजापूर येथे शाखेचे उद्घाटन अतिशय आनंदमय वातावरणात पार पडले. या वेळी उद्घाटक विठ्ठलराव देशमुख – प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पंढरीनाथ हुंडेकर – जिल्हाध्यक्ष उत्तर प्रहार दिव्यांग क्रांती सघटना नांदेड, विजयाताई काचावार – जिल्हा महिला अध्यक्षा प्रहार जनशक्ती पक्ष, साईनाथ पा.जुनीकर – ता. अध्यक्ष धर्माबाद, नारायण सोनटक्के – तालुका सचिव यांच्या हास्ते संपन्न झाले.
या आगोदर मौजे मास्टी, बेल्लारी बु, बेल्लुर खुर्द, जुन्नी असे एकूण चार गावात फलकाचे अनावरण करून प्रहार दिव्यांग क्रांती संघटना ग्राम शाखेची बुथ बांधनी करण्यात आली होती. त्याच प्रमाणें मौजे बाचेगाव, पांगरी, राजापूर येथे प्रहार शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखेची निवड करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व सदस्य यांची निवड करण्यात आली.
या वेळी मारोती मंगरुळे – प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव, प्रमुख पाहुणे गणेश पा.हांडे अजंनीकर – जिल्हा संपर्क प्रमुख प्रहार जनशक्तिपक्ष, अनिल पा.शेटे मुदखेड – ता.अध्यक्ष, साईनाथ बोईनवाड नायगाव – ता.अध्यक्ष, संगीता बामणे – ता.उमरी महिला अध्यक्ष, शांताबाई चिंतंले – बिलोली महिला अध्यक्ष, शंकरराव शिंदे, व तीनही गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व धर्माबाद तालुक्यातील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी, बळीराम पा.सुर्यवंशी – कार्याध्यक्ष,पोशठ्ठी मादनूरे, हनमंतु देसाई – शहर अध्यक्ष, शिवराज बंगरवार, माधव पांचाळ, माधव सोनकांबळे, जयराम टोकलवार, रानोळकर, नागठानकर व दिव्यांग बांधव, जेष्ठ नागरिक, विधवा महिलांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy