प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती च्या वतीने धर्माबाद तालुक्यात शाखेचे अनावरण !
[ धर्माबाद प्रतिनिधी – चंद्रभीम हौजेकर ]
दि.09/12/2021 गुरवारी मा.ना.बच्चु भाऊ कडू राज्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रेरणेतून बेल्लूर, बेल्लूर जापलापूर, जुन्नी या गावात प्रहार शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा प्रमुख मा. विठ्ठलरावजी मंगनाळे, जिल्हा प्रमुख ज.श.प्र. विठठलराव देशमुख, जिल्हअध्यक्ष ( उत्तर ) पंढरीनाथ हुंडेकर साहेब, गणेश पाटील हांडे, ज.श.जिल्हा संपर्क प्रमुख (दक्षिण)श्रीराम पवार आलूवडगावकर, मारोती मंगरुळे जिल्हा सचिव, जिल्हा संपर्क प्रमुख राजू भाऊ इबितवाड, आशा ताई रेड्डी महिला अध्यक्षा ता.बिलोली आणि प्रहार ता.प्रमुख साईनाथ पाटील जुन्नीकर धर्माबाद यांच्या अध्यक्षतेखाली शाखा अनावरण करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले योग्य ते मार्गदर्शन देशमुख साहेब व हांडे साहेबांनी केले. दिव्यांग, निराधार गोरगरीब जनतेला कशा प्रकारे योजना राबविल्या जातात हे आपल्या भाषणातून व्यक्त केले .
यावेळी प्रहार ता.अध्यक्ष अनिल शेटे पाटील मुदखेड, साईनाथ बोईनवाड नायगांव अध्यक्ष, हानमंत सिताफुले बिलोली अध्यक्ष, देगलूरकर प्रकाश नारल्लावार, सह शिक्षक रेड्डी सर , महिला अध्यक्षा केशरबाई शंकरराव शिंदे पाटील मुदखेड, उमरी महिला अध्यक्षा संगीता बामणे, जुन्नी या गावचे सरपंच अर्चना ताई रेड्डी उपसरपंच अंबादास पाटील डांगे धर्माबाद मार्केट कमिटी सचिव चंद्रकांत भाऊ, रामदास पाटील तंटामुक्ती अध्यक्ष जुन्नी, शिवराज बंगरवार, नारायण सोनटक्के, माधवराव पांचाळ, पोशटटी मदनुरे, बळीराम पाटील, नागठाणकर बंधु, प्रहार पदाधिकारी दिव्यांग बांधव, निराधार महिला, वयोवृद्ध व्यक्ती, अनाथ मुले, कामगार शेतमजूर, असे असंख्य प्रहार कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते .
www.massmaharashtra.com
युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून.