प्रहार दिव्यांग संघटनेच्या मागणी ला यश! 300 दिव्यांगांना देणार अंत्योदय योजनेचा लाभ-तहसीलदार दत्तात्रय शिन्दे

(धर्माबाद प्रतिनिधी – नारायण सोनटक्के)
धर्माबाद तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेत लाभ देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने धर्माबाद तहसील कार्यालयापुढे 21 जून पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.

दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात यावे असे आयुक्तांचे आदेश असतानाही धर्माबाद तालुक्यात पुरवठा विभागाच्या निष्क्रियतेमुळे दिव्यांगाना धान्य व राशन कार्ड देण्यासाठी जानीव पुर्ण टाळाटाळ होत असल्याने दिव्यांगावर उपासमारीची वेळ आली त्यामुळे उपरोक्त प्रकरणात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्यावर शिस्त भंगाची कारवाई करण्यात यावी व दिव्यांगांना अंत्योदय योजेचा लाभ द्यावा या मागणीसाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.

पण आज दि.22रोजी तहसीलदार दत्तात्रय शिन्दे यांनी दिव्यांगाच्या पात्र आर्जदारांच्या सर्व मागण्या पूर्ण करुन मी जवळपास 300 लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेचा लाभ देईन असे लेखी उत्तर देवून 6 अमरण उपोषणकर्ते यांचे उपोषण सोडविले
यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव मंगनाळे, पंढरिनाथ हुन्डेकर, मारोती मंगळरूळे,साईनाथ बोईनवाड, माधवराव कोंसबे, बालाजी भुरेवाड,राजु इरेवाड,नागेश काळे, पोशठ्ठी मादनुरे, संगीता गोळेगावकर,हनमंत सिताफळे, एकनाथ संत्रे,अनिल धोटे,गोविंद लोणे,माधवराव पुयड ,विनोद कोकाटे, भगवान हिंगोले, आनिल शेट्टे,गोपिनाथ मुडे प्रत्येक तालुक्यातील तालुका अध्यक्ष, चांदु आंबटवार,व धर्माबाद प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष साईनाथ पाटील जुनीकर,बळीराम पाटील सूर्यवंशी, नारायण सोनटक्के, शिवराज बंगरवार, जीवन चव्हाण,माधव सोनकांबळे अनिल उशलवार,मोहन भोसले, साईनाथ पुजरवाड,सय्यद मुक्राम, यांच्या सह अनेकजन कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या