प्रजासेना संघटना प्रमुख अ‍ॅड.अरूणकुमार सुर्यवंशी यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश !

[ नांदेड – दि.२०.१०.२०२१/ देगलूर ]
देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडी ताकतीने लढत असुन यानिमित्त घेण्यात आलेल्या प्रचारसभेत प्रजासेना संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.अरूणकुमार सुर्यवंशी कोळगावकर यांनी श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय भुमिकांना प्रभावित होऊन प्रजासेना संघटना वंचित बहुजन आघाडीत विलीन करत अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना अ‍ॅड.अरूणकुमार सुर्यवंशी म्हणाले की, सुरूवातीपासूनच मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय सामाजिक भुमिकांना अग्रस्थानी ठेवून काम केल आहे. इथुन पुढेही ते अविरत पणे चालु ठेवून पक्षबांधणी वर भर देईन. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी स्वीकारून काम करणार असल्याच त्यांनी सांगितल आहे.

अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय असणारे अ‍ॅड.अरूणकुमार सुर्यवंशी यांनी अ‍ॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या राजकीय सामाजिक भुमिकांच्या सोबत राहून अनेक आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सबंध नांदेड जिल्ह्यात स्वखर्चाने पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला.
अ‍ॅड.अरूणकुमार सुर्यवंशी यांची संघटन बांधणी नांदेड जिल्ह्यात मजबूत असुन याचा फायदा वंचित बहुजन आघाडीस बळकटी मिळण्यास नक्कीच होईल अस पक्षश्रेष्ठी आणि जनतेतून बोलल जात आहे. अ‍ॅड.अरूणकुमार सुर्यवंशी यांच्यासारखा लोकप्रिय व आक्रमक चेहरा वंचित ला मिळाल्याने पक्षाच्या महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांकडून या निर्णयाच स्वागत केल जात आहे. हजारो लोकांच्या समोर हा प्रवेश देगलूर येथे पार पडला.
यावेळी मंचकावर सर्वजीत बनसोडे, फारूख अहमद, गोविंद दळवी, अक्षय बनसोडे, चेतन गांगुर्डे, शिवा नरंगले, शाम कांबळे, चित्राताई कुर्हे, अ‍ॅड.कमलेश चौदंते, देगलुर बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीचे उमेदवार डॉ.उत्तम इंगोले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या