हाथरस पिडीतास न्याय द्या व उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा – प्रजासेना संघटनेची मागणी.

दलित अत्याचार व हत्याकांड प्रकरणी पिडीतास न्याय मिळणे व विद्यमान उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करणे बाबत निवेदन प्रजासेना संघटनेतर्फे राष्ट्रपती याना पाठवण्यात आले आहे.

प्रजासेना संघटना प्रमूख अरूणकुमार सुर्यवंशी यांच्या आदेशाने,संघटनेच्या एका शिष्टमंडळाने तहसिल कार्यालय धर्माबाद येथे हे निवेदन दिले.

उत्तर प्रदेश ,हाथरस याठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मनीषा वाल्मिकी नावाच्या 19 वर्षीय तरूणीवर मारहाण करून 19 सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिने याची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची जीभ देखील या नराधमांनी छाटली होती. उपचारादरम्यान दिनांक 29 सप्टेंबर रोजी रोजी तिचा मृत्यू झालेला आहे.आणि पिडीत मनिषाच्या कुटुंबाला कसलीही सुचना न देता मयत पिडीत मनिषा वाल्मिकी चा मृतदेह उत्तर प्रदेश पोलिसांनी जाळला.याचे दृश्य सोशल मिडीया वर उपलब्ध झाले आहेत.

या अमानवीय घटनेचा निषेध नोंदविणे आवश्यक झालेले आहे. कारण अशा प्रकारच्या घटना देशभर विशेषत: उत्तर प्रदेश मध्ये वारंवार घडत आहेत.

उत्तर प्रदेशात दलित अत्याचाराच्या घटनांचा कळस गाठला आहे.

अशा प्रकारच्या घटना सातत्याने त्याठिकाणी घडताहेत. यापूर्वी जमिनीच्या कारणावरून दोनशे ते अडीचशे सवर्ण समाजाच्या लोकांनी अंदाधुंद गोळीबार करून 20 दलित-आदिवासींना ठार मारले होते, यातील आरोपींना अटक करण्या एैवजी याचा निषेध नोंदवायला जाणाऱ्या प्रियंका गांधींनाच उत्तर प्रदेश सरकारने अटक केले.

दुसऱ्या घटनेत जातीय अत्याचाराचा प्रतिबंध केला म्हणून चंद्रशेखर आजाद उर्फ रावण याला रासुका अंतर्गत जेलमध्ये डांबले. नुकतेच अशाच एका जाती अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री नितीन राऊत उत्तर प्रदेश या ठिकाणी गेले असता त्यांना देखील अटक करण्यात आले होते.

एकंदरीतच जातीय अत्याचाराच्या घटना घडवण्यासाठी जात्यांध, धर्मांध वृत्तीच्या लोकांना रान मोकळे करून देणे आणि अशा घटना घडल्यानंतर सुद्धा त्या आरोपींना अटक न करणे, या सोबतच जे या घटनेचा निषेध नोंदवतील त्यांच्यावर मात्र अटकेची कारवाई करणे. अशा चुकीच्या पद्धतीचा राज्यकारभार उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे हाथरस येथे जातीय हत्याकांडात व अत्याचारात बळी पडलेल्या मनीषा वाल्मिकी या भगिनीस आदरांजली अर्पण करून खालील प्रमाणे आपनाकडे मागण्या करण्यात येत आहेत.

1) उत्तर प्रदेश येथिल योगी आदित्यनाथ सरकार बरखास्त करण्यात यावे.

2) दलित अत्याचाराच्या प्रश्नावर देशभरातील सर्वच सरकारांनी कठोरतेने भूमिका घ्यायला हवी.
3) हाथरस हत्याकांडातील मनीषा वाल्मिकी यांचेसह देशभरातील सर्वच जातीय अत्याचारातील हत्त्यांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावेत.

अश्या प्रकारच्या मागण्या या निवेदनात केल्या आहेत.

यावेळी ,
१.लक्ष्मण लोखंडे पांगरीकर (प्रजासेना धर्माबाद तालुका आध्यक्ष)

२.चंद्रकांत भाऊ कुमारे (प्रजासेना धर्माबाद तालुका उपकार्याध्यक्ष)

३.नितीन भाऊ वाघमारे(प्रजासेना धर्माबाद तालुका कार्याध्यक्ष)

४.संघरत्न भाऊ लोखंडे (प्रजासेना धर्माबाद तालुका सहसंघटक)

५.महिंद्र भाऊ कुमारे (प्रजासेना धर्माबाद तालुका मिडीया प्रमुख)

६.आंकुश भाऊ वाघमारे (प्रजासेना कार्यकर्ता )
७.बुध्दिवंत भाऊ लोखंडे धर्माबाद

( प्रजासेना धर्माबाद शहर प्रमुख)

८.आनिल भाऊ सोंनकांबले पांगरिकर-प्रजासेना कार्यकर्ता

९.वैभव भाऊ सोंनकांबले(सामाजिक कार्यकर्ता)

१०.आतिश भाऊ आढाव(सामाजिक कार्यकर्ता)

११.भिवाजी भाऊ भेरजे (सामाजिक कार्यकर्ता)

१२.आजय भाऊ कंधारे (सामाजिक कार्यकर्ता)
उपस्थीत होते.

ताज्या बातम्या