प्रणव भोरे कॅरम स्पर्धेत विभागीय तर 23 विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड.

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 बिलोली तालुक्यातील तालुकास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी येथे नुकतेच संपन्न झाले .यामध्ये तालुक्यातील विविध शाळांनी खेळामध्ये सहभाग नोंदविला यात के. रामलू शाळेचे विद्यार्थी विविध स्पर्धेत यश संपादन केले.
त्यामध्ये तन्मय ठक्कुरवार (400 मीटर रनिंग, रिले, लांब उडी )आरती भोरे (रनिंग 200 मीटर) श्रुती हाके( रनिंग रिले 400 मीटर) कृष्णा दम्मेवार (रनिॅग रिले 400 मीटर )संप्रीती मॅकलवार( लांब उडी) विशाखा चंदनकर( उंच उडी )शैलेश केशोड (उंच उडी/ थाळीफेक) प्राची येडे( उंच उडी) साईकिरण आरशेवार( उंच उडी) विश्वनाथ भाले (उंच उडी)नीता गायकवाड( थाळीफेक) एमडी कैफ (थालीफेक) दीपक गुडेमवार( गोळा फेक ) वैष्णवी कोंडावार (रिले) मयुरी सोळंके( रिले) अविनाश नरावाड (रिले )दानिश सय्यद( रिले) वरद रत्नागिरी( रिले) आकर्ष नरवाड (रिले) वरील विद्यार्थी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
तसेच जिल्हास्तरावर झालेल्या कॅरम स्पर्धेत प्रणव राजेंद्रकिरण भोरे या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली .या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री रमेश कासलोड व सौ.अर्चना नरोड यांचे संस्थेचे संस्थापक श्री. सायरेड्डी ठक्कुरवार, संचालिका सौ. रमा ठक्कुरवार सचिव मा. श्री यशवंत संगमवार मुख्याध्यापक मठवाले, पर्यवेक्षक कागळे व शाळेचे सर्व शिक्षकवृंदांनी सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय व विभागीय स्तरावर होणाऱ्या खेळासाठी खेेळाडुंंना शुभेच्छा दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या