सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनातून गणेश उत्सव साजरा करा ; उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते यांचे प्रतिपादन !!

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]

          येथील पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या शहर व परिसरातील नागरिकांसाठी आगामी होऊ घातलेल्या पोळा, गणेश उत्सव व ईद-ए-मिलाप आदि उत्सवाच्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक दिनांक 12 रोजी आयोजित करण्यात आली होती,या बैठकीत आगामी होणारे सर्व उत्सव सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून साजरे करावे असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत संपते यांनी उपस्थित नागरिकांना केले आहे….

          कुंडलवाडी येथील नगरपालिका सभागृहात दिनांक 12 रोजी सायंकाळी 5 वाजता आगामी होऊ घातलेल्या गणेश उत्सव व ईद-ए-मिलाप या सणाच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक घेण्यात आली,या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते यांनी उपस्थित नागरिकांना संबोधताना असे प्रतिपादन केले की, आगामी गणेश उत्सव साजरा करताना पारंपारिक वाद्यांचा वापर करून डीजे मुक्त वातावरणात साजरा करावा, या गणेश उत्सवाच्या दरम्यान गणेश मंडळांनी सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करून सामाजिक प्रबोधन करावे व सर्व गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करून शहरात कायदा व सुव्यवस्था आबादी ठेवावे असे आवाहन नागरिकांना केले आहे, तर ईद-ए-मिलाप कमिटीच्या पदाधिकारी व मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलापची मिरवणूक दिनांक 28 ऐवजी 30 रोजी शहरातून काढण्याची भूमिका मुस्लिम समाज बांधवांनी घेतला आहे त्यामुळे मुस्लिम बांधवांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

           या बैठकीत माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार, माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ विनोद माहुरे,पत्रकार अमरनाथ कांबळे,महंमद अफजल,गणेश कत्रुवार,राजू लाभशेटवार,दत्तू हमंद,गंगाप्रसाद गंगोणे,आदिनी विविध विषयावर आपले मनोगत व्यक्त केले आहे. यावेळी या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते, माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार, साईनाथ उत्तरवार, डॉ विनोद माहुरे, कनिष्ठ अभियंता सुरेश गट्टूवार, साहयक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, पोलीस उपनिरीक्षक, नारायण शिंदे,आदीसह पत्रकार,गणेश मंडळाचे पदाधिकारी मुस्लिम कमिटीचे सर्व सदस्यआदिसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.या बैठकीचे सूत्रसंचलन संतोष शिवशेट्टे यांनी केले तर आभार सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित कासले यांनी मानले…..

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या