नरसीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस विविध लोककल्याणकारी उपक्रमांनी जल्लोषात साजरा.

प्रचंड जनसमुदायाच्या सानिध्यात भगवान बालाजीची भव्य महाआरती ; गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहीत्याचे मोफत वाटप…

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस नरसी येथे लोक कल्याणकारी उपक्रम राबवून जल्लोषात साजरा झाला.भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य दिव्य महाआरती प्रसंगी येथील श्रीमंत भगवान बालाजी मंदीरात उपस्थित प्रचंड जनसमुदायाने आपल्या लाडक्या नेतृत्वास उदंड आयुष्याची एकमुखी प्रार्थना केली.

    “वसा लोकसेवेचा – ठसा कर्तृत्वाचा” हे ब्रीद घेवून जनसामान्यांच्या उन्नतीसाठी अविरत कार्यरत असणारे विकासाभिमूख खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या जन्मदिनी नरसीत जनहिताचे विविध उपक्रम उत्साहात पार पडले.भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांना जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
    प्रारंभी नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात माजी आमदार सुभाष साबणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर, प्रदेश सदस्य बालाजी बच्चेवार, युवा नेते रुपेश कुंटूरकर, शंकर कल्याण आदींसह असंख्य भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व फटाक्यांच्या अतिषबाजीत भव्य महाआरती करण्यात आली.
   त्यानंतर केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनेगांव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शामनगर याठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना माजी आमदार सुभाष साबणे, सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, रुपेश कुंटूरकर यांच्या हस्ते मोफत शालेय साहीत्य वाटप करण्यात आले.यावेळी शिक्षकवृंद व नागरीकांची मोठी उपस्थिती होती.
    खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या रुपाने लाभलेला दमदार व कर्तबगार खासदार हे आपले भाग्य असल्याचे गौरवोदगार यावेळी भिलवंडे यांनी काढले.यानिमित्ताने नरसी नगरी असंख्य शुभेच्छा फलकांनी सजल्याचे उत्सवपुर्ण दृश्य दिसून आले.श्रावण पाटील भिलवंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी केलेले जबरदस्त शक्तीप्रदर्शन लक्षवेधी ठरले.
    खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या जन्मदिनी नरसीत पार पडलेल्या लोकाभिमुख कार्यक्रमांत माजी आ.सुभाष साबणे, सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पा.होटाळकर, बालाजी बच्चेवार, रुपेश कुंटूरकर  यांच्यासह तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.
याप्रसंगी नरसी येथील शंकर पाटील कल्याण, शंकर लाब्दे, भगवान लंगडापुरे, शिवाजी वडजे, व्यंकट चव्हाण, आनंद बावणे, शंकर पाटील शिंदे, बाबाराव रोकडे, मोहन पाटील भिलवंडे , मारोती पाटील भिलवंडे , व्यंकट कोकणे, वसंत कस्तुरे, साईनाथ आक्कमवाड, गजानंन भिलवंडे , अलीम पटेल, राजु वडगांवे, नारायण खनपट्टे, हाणमंत मिसे, त्र्यंबक डाके, बालाजी नरसीकर, किशन खनपट्टे, मारोती बुक्के, किशोर जाणोरे, व्यंकट नागेश्वर, हाणमंत भवरे, दिगांबर भिलवंडे , विनोद भिलवंडे , सचिन नरसीकर, संदीप राठोड , संतोष बोधने, दादाराव बावणे, फारूक पटेल, साईनाथ पांचाळ, वसंत बोधने, बालाजी नरसीकर, विनोद बच्चेवार, शिवा मेटकर, कपीलेश्वर नलबरवार सर, राजु पाटील आनेराये, शिवाजी शिंदे, बालाजी मजरे, संजय पाटील टाकळीकर, आदी प्रमुख कार्यकर्ते व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या