नायगाव शहरातील अभियान सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांच्या कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली शहरातील मुख्य रस्त्याने खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नागरिकांशी संवाद साधून मोदी सरकार करत असलेल्या माहितीचे पत्रक दिले. यावेळी शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. या अभियानामध्ये नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद देत होते. त्यामुळे नायगाव शहर हे भगवेमय झाले होते.
कार्यकर्त्यांनी दस्ती टोपी घालून नायगाव शहरांमध्ये पदयात्रा काढली. अभियानाचे मुख्य उद्दिष्ट साध्य करताना “बलशाली भारताचे स्वप्न सत्यात उतरवणारे, आदरणीय पंतप्रधान मोदींजींनी आजवर समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेकडो योजना राबविल्या यामध्ये पंतप्रधान आवास योजना लाभार्थी, उज्वला गॅस योजना लाभार्थी, शेतकरी अनुदान लाभार्थी, स्वछता लाभार्थी, केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना जसे एन.आर.सी. 370 A, कलम, सुरक्षा, राम मंदिराची निर्मिती, कोरोना कोव्हिड 19, काळातील कार्य अश्या अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची भेट आसाम सीमेवर कार्यरत असलेल्या जवान पिंजारी कुटुंबीयाशी संवाद साधून त्यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार खा.चिखलीकर यांनी केला यावेळी हे कुटुंब भारावून गेले होते.
यावेळी खा.चिखलीकर यांनी जवानांच्या विषयी मोदी सरकार करत असलेल्या कामांची माहितीची चर्चा केलीगाव चलो अभियान नायगाव शहर येथे बूथ क्रमांक 256,257, 258, 259,261 येथील नागरिकांशी संवाद त्याचबरोबर शहरातील मद्रेवार फॅमिली शॉप, चिद्रावार कापड दुकान, पृथ्वी कलेक्शन, हेडगेवार चौकातील हातगाडीवाले भाजीपाला विक्रेते यांना मोदी सरकारने करत असलेल्या कामांची माहिती खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रत्यक्ष जाऊन दिली त्याचबरोबर काम करणाऱ्या मुनीम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी शहरात फिरत असताना महिलांनी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या औक्षण करून स्वागत केले. जोरदार फटाक्याची आतिश बाजी करून नायगाव शहर दुमदुमून टाकले.
नायगाव शहरात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत गाव चलो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते बालाजी बच्चेवार, माजी शिक्षण सभापती श्री शिवराज पाटील होटाळकर भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य गंगाधरराव जोशी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश कुंटूरकर, भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, भारतीय जनता पार्टीचे धनराज शिरोळे, भाजपा जिल्हा चिटणीस विशाल पाटील शिंदे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील बेंद्रीकर, साहेबराव पाटील पवार, प्रभाकर पाटील मोरे अंचोलीकर, संभाजी पोटफोडे, प्रदीप देमेवार, चंद्रकांत चव्हाण, गणेश पवळे, रविकांत पवळे, शिवाजी पाटील ढगे, लालवंडीचे माजी सरपंच भगवानराव लंगडापुरे, गजानन पाटील चव्हाण, पळसगावचे माजी सरपंच शिवाजी पाटील शिंदे, व्यंकटराव पाटील चव्हाण, नावंदीचे माजी सरपंच महेश देशपांडे, खैरगावचे माजी सरपंच कुमुद पटेल, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष गुरुनाथ पाटील शिंदे, नरसीचे माजी सरपंच कोकणे, विनायकराव पाटील गोळेगावकर, भाऊ पाटील चव्हाण, अंतरगावचे सरपंच गजानन पाटील तोडे, बळवंत पाटील शिंदे आंतरगावकर, मुगावचे माजी सरपंच गंगाजी पाटील आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शहरातील व परिसरातील भारतीय जनता पक्षाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नायगाव शहरातील विकास कामासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy