मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व आपले नेते एस.एम. देशमुख सर यांच्या खंबिर नेतृत्वाखाली काम करणारी नांदेड जिल्हा मराठी पञकार संघ संलग्नित असलेल्या नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाला मिळालेला राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार भुषणावह आहे.
परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांसह कोषाध्यक्ष विजय जोशी साहेब,लातूर विभागाचे सचिव प्रकाश कांबळे साहेब व जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर साहेब, जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपला तालुका मराठी पत्रकार संघ आज राज्यात नावलौकिक प्राप्त ठरला.
यासाठी आमचे मार्गदर्शक व जिल्हा उपाध्यक्ष आणि तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे साहेब यांचा सिंहाचा वाटा असून आपल्याला त्यांचेसारखे कणखर नेतृत्व असल्याने आणि माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर साहेब व माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपञेवार, गंगाधर भिलवंडे पाटील, पंडित वाघमारे यांनी वेळोवेळी त्यांना सहकार्य केले.
म्हणूनच आपण हा पुरस्कार मिळविला आहे. सर्वांच्या पाठबळावर तालुक्याला आम्ही पुरस्कार मिळवू शकलो.तालुकाध्यक्ष गजानन चौधरी यांच्यासह या कार्यकारिणीत तालुका सदस्य म्हणून मला नक्कीच याबाबत अभिमान आहे.
राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आपली प्रत्येकांची जबाबदारी वाढली आहे म्हणून यापुढील काळात आपण एकजुटीने संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत हि अपेक्षा.
सर्व मान्यवर व सहकारी यांचे या निमित्ताने जाहिर आभार व्यक्त करतो. असे वक्तव्य किरण शंकरराव वाघमारे – तालुका कार्यकारिणी सदस्य, तालुका मराठी पत्रकार संघ नायगांव यांनी मास महाराष्ट्र शी बोलताना केल आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy