प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य सल्लागारपदी महाराष्ट्रातील नामांकित साहित्यिक,जेष्ठ पत्रकार प्राचार्य डॉ.वसंत बिरादार यांच्या शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारीतेतील कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ललित लेखक, समीक्षक तथा लोह्याचे ज्येष्ठ पत्रकार, व महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूरचे प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले डॉ. वसंत बिरादार हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या अभ्यास मंडळावर सलग १५ वर्ष, तसेच याच विद्यापीठाच्या लातूर येथे असलेल्या उपकेंद्रात प्राचार्य प्रतिनिधी म्हणून काम केलेले, मसापचे स्वीकृत माजी सदस्य, तसेच औरंगाबादच्या मराठी अभ्यास मंडळात तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून काम केले आहे.
शिवाय पुणे,अमरावती,धारवाड, विद्यापीठांमध्ये विविध प्राधिकरणावर काम करणारे, विविध साहित्य संमेलनात वावरणारे, पद भूषविणारे, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी ‘लोकमत’ या वृत्तपत्रात इ. स. १९९० पासून सलग २०१४ पर्यंत लोहा तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. आजही ते ‘दै. वतनवाला’ व ‘दै.गोदातीर’, ‘दै. रिपब्लिकन गार्ड’ मधून आजही सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वाङ्मयीन व सामाजिक हिताच्या दृष्टीने लेखन करून विविध प्रश्नांना वाचा फोडतात.
आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सतत २५ वर्षे सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. त्यांना शैक्षणिक, वाङ्मयीन, पत्रकारिता यासह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या शैक्षणिक कारकीर्द लक्षात घेऊन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना नुकतीच अमेरिकेतील नामांकित सेंट्रल विद्यापीठाने’ डी. लिट्.’ ही मानाची पदवी देऊन गौरव केला आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य सल्लागारपदी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे घोषित केले.
प्राचार्य डॉ. वसंत बिरादार संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, शेख मौला शेख उस्मान, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, संघटक श्रीनिवास माने, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संघटक संजय लांडगे, कोकण संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. देवराव तायडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. संजय भिडे, विठ्ठल शिंदे, उत्तर महाराष्ट्र संघटक साहेबराव बाबर, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ही निवड जाहीर करण्यात आली.
असल्याचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी कळविले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नांदेड जिल्हाउपाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे,लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पवार, उपाध्यक्ष संजय कहाळेकर, कार्याध्यक्ष बा.पु.गायखर, सरचिटणीस प्रदिप कांबळे, सचिव मारोती चव्हाण, सहसचिव तुकाराम दाढेल, कोषाध्यक्ष रमेश पवार,सहकोषाध्यक्ष संतोष तोंडारे, प्रसिद्धी प्रमुख शिवराज दाढेल,सदस्य अशोक सोनकांबळे, शैलेश ढेंबरे सह आदींनी शुभेच्छा दिल्या.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy