प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुकाध्यक्षपदी शिवराज पवार यांची निवड !
( विशेष प्रतिनिधी-रियाज पठाण )
लोहा येथील पत्रकार शिवराज पांडुरंग पवार यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली असून त्यांच्या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष डि.टी.आंबेगावे यांनी नुकतेच दिले आहे.
नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या निवडी संदर्भात संस्थापक अध्यक्ष डि.टी.आंबेगावे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्टपणे कार्य करणारे लोहा येथील तरुण तडफदार पत्रकार शिवराज पांडूरंग पवार यांची लोहा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
असून जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड,जिल्हा कार्याध्यक्ष विशाल पवार,जिल्हा संघटक शंकरसिंह ठाकूर, जिल्हा संपर्कप्रमुख मारोती शिकारे,मराठवाडा महिला अध्यक्षा सविता हिंगोले,राज्य महिला उपाध्यक्ष सविता चंद्रे,जिल्हा महिलाध्यक्षा विजया सोनटक्के,यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.
या निवडीबद्दल मित्र परिवाराकडून नूतन तालुकाध्यक्ष शिवराज पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.