पत्रकारितेतील निर्भिड व्यक्तीमत्व शिवराज पाटील पवार

[ विशेष प्रतिनिधी – रियाज पठान ]
सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱे निर्भिड पत्रकार शिवराज पाटील पवार यांचा आज दि.१जुलै रोजी वाढदिवस आहे त्यांच्या कार्या संबंधाचा घेतलेला हा आढावा प्रसिद्ध करत आहोत.
     पत्रकार शिवराज पाटील पवार यांचा जन्म दि. १ जुलै १९८१ सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात लोहा तालुक्यातील पारडी येथे आई सौ.लक्ष्मीबाई पवार व वडील पांडुरंग पाटील पवार यांच्या उदरी झाला.कुटूंबात पाच बहिणी तिघे भाऊ चा मोठा परिवार.दुसरा भगवान बंधु सधन शेतकरी तर तिसरा भारतीय सैन्य दलात उच्च पदावर कार्यरत आहे. शिवराज चे चौथी पर्यंतचे शिक्षण जि.प.प्रा.शाळा पारडी येथे झाले.
पाचवी ते बारावी कै.वि्श्वनाथराव नळगे मा.व उ.मा.विद्यालय लोहा येथून तर बी.ए.पर्यंतचे शिक्षण श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा येथे,एम. ए.मराठी व एम.ए. इतिहास प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड व पिपल्स कॉलेज नांदेड, राष्ट्रमाता अध्यापक महाविद्यालय येथून,नंतर बी.एड्.,बी.लीब.,जी.डी.सी. ऍण्ड ए.अशा विविध उच्च पदव्या घेत कॉलेज जिवनापासूनच विविध सामाजिक कार्याला सुरुवात केली.
      चुलते माजी सरपंच कै.संभाजी पाटील पवार, मेव्हणे माजी सरपंच दिगांबर डिकळे,माजी आमदार रोहिदास चव्हाण,माजी नगराध्यक्षा सौ.आशाताई चव्हाण यांच्या सहवासातून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्याला अगदी जवळून पाहिले.त्यांचा आदर्श समोर ठेवून पुढील वाटचालीस सुरूवात केली.अर्धांगिनी सौ.उषाताई पवार यांनी २००३ पासून वेळोवेळी साथही दिली.म्हणून समाजात काम करत असताना निःपक्षपाती पणे, निस्वार्थ भावनेने पणे कार्य करण्याचे ठरविले.
     नेहरू युवा केंद्र नांदेड येथे राष्ट्रीय सेवा कर्मी, तालुका विधी सेवा प्राधिकरण सदस्य,स्वयं शिक्षण प्रयोग तालुका समन्वयक,जीवनोन्नती अभियानात प्रशिक्षक,साक्षर भारत योजना/अभियानात प्रेरक म्हणून ग्रामस्तरापासून ते राज्य लेवल पर्यंत महत्वाची भुमिका पार पाडली.क्रीडा विभागात उत्कृष्ट धावपटू म्हणून त्यांची राज्य स्तरावर नोंद ही झालेली आहे.नांदेड जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या माध्यमातून जनतेची सेवा करता आली.समाजातील विविध प्रश्न हाताळत अनेकांना न्याय मिळवून दिला.२०१९ ला पत्रकारितेत पदार्पण करून अन्यायाविरूद्ध लेखणीच्या माध्यमातून आजतागायत वाटचाल सुरू आहे.सन २०२० ते आजतागायत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतात.
    २००५ ला नेहरु युवा केंद्र नांदेड कडून लोहा तालुक्यासाठी राष्ट्रीय सेवा कर्मी म्हणून जिल्हा समन्वयक चंदा रावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उल्लेखनीय कार्य केले.तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये,विविध स्पर्धांचे शिबिरांचे आयोजन करून ग्रामीण भागातील लोकांसाठी विविध मेळाव्याचे आयोजन करून युवक शेतकरी यांना न्याय मिळवून दिला.माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या मुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लोहा येथे कार्यरत असतांना तालुक्यातील अनेक शेतकरी, कष्टकरी, सामान्य,गोरगरीब, राजकीय पुढारी ,बैंकेशी निगडित असलेला तालुक्यातील प्रशासनातील कर्मचारी वर्ग यांची सेवा करण्याचे सलग पाच ते सहा वर्षे भाग्य लाभले.बैंक डबघाईस आल्यामुळे सदरिल कर्मचारी भरती रद्द करण्यात आली.
      नंतर लोहा न्यायालयात सरकारी वकील बी.एम.लोमटे यांच्या आग्रहाखातर लोहा तालुका विधी सेवा प्राधिकरण वर सदस्य म्हणून सामाजिक कार्यकर्ते असल्याने विविध प्रश्न हाताळत लोकन्यायालयात अनेक प्रकरणे मिटवत तडजोडी करत तालुक्यातील मोफत कायदेविषयक शिबीराला भरपूर वेळ देत उल्लेखनीय, प्रशंसनीय कार्य केले.स्वयं शिक्षण प्रयोग या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राजाभाऊ जाधव यांच्या माध्यमातून तालुक्याची जबाबदारी घेऊन महिला बचत गट, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मिती, सौर ऊर्जा, विविध सखी मेळावे, व्यसनमुक्ती असे विधी उपक्रम राबवत या राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक संस्थेत काम करत तालुक्यात वेगळी छाप पाडली.यासह विविध सामाजिक कार्यात नोंद करत त्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दारिद्रेय रेषेखालील बचत गटांना तत्कालीन विस्ताराधिकारी एस.एन.सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण देत तालूका पिंजून काढला.
सामाजिक कार्य करत असताना सन २०११ मध्ये त्यांची प्रेरक म्हणून पारडी ग्रामपंचायतीला गुणवत्तेच्या आधारे निवड झाली.अत्यल्प मानधन असतांनाच ग्रामीण भागातील या प्रेरकांचे प्रश्न घेऊन दिल्ली पर्यंत पोहचले.संसदेवर सलग तीन वेळा हजारोंच्या संख्येने मोर्चे काढले.मुंबई मंत्रालयावर ही मोर्चे काढले.अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालय पुणे येथे मोर्चे आंदोलने केली.जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेवर मोर्चे, उपोषणे, आंदोलने केली.उग्र आंदोलन चालू ठेऊन प्रशासनाला जेरीस आणण्याचे काम केले.तत्कालीन केंद्र व राज्य सरकारला वेळोवेळी हादरून सोडले.यावेळी जि.प.शाळेचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून यांच्याशी सल्लामसलत करून अनेक अन्याय कारक प्रकरणे मार्गी लावली.यावेळी पि.आर.चिखलभोसीकर,प्रा.प्रभाकर व्यवहारे,शहाजी पाटील शिंदे, शिवाजी पाटील यांनी वेळोवेळी साथही दिली.तत्कालीन व आत्ताच्या नांदेड जिल्हा शिक्षणाधिकारी सौ. सविता बिरगे मैडम, सहायक प्रकल्प अधिकारी विनोद जाधव तसेच विविध जिल्ह्यांत शिक्षणाधिकारी इतर अधिकारी वर्गाकडून अनेकांना न्याय ही मिळाला.
   शिवराज ने कोणतीच अपेक्षा न ठेवता सतत जनतेची कामे करत समाजकार्य करत राहिले.गरजू, निराधार,विधवा महिलांचे प्रश्न, याबरोबरच विज, घरकूल,राशन,यांसह विविध प्रश्न हाताळत आजही लोकांसमोर उभे राहतात.
समाजातील विविध प्रश्न लिखाणाच्या माध्यमातून मार्गी लावले.२०१९ ला स्वराज्य २४ तास, राजमुद्रा लाईव्ह न्युज, महा २४ न्यूज च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारीतेच्या क्षेत्रात पदार्पण केले. स्वतः बातम्या शोधून समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. जातीभेद,धर्मपंथ भेदभाव कधीही त्यांनी बघितला नाही. त्यानंतर त्यांनी दैनिक हिंदूसम्राट या दैनिकांमध्ये काम करत असताना नंतर ते दैनिक वतनवाला लोहा तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यान्वित झाले. या वृत्तपत्रात सुद्धा त्यांनी समाजातील विविध घटकांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत असतात.
समाजातील कोणताही राजकीय सामाजिक प्रश्न असो त्यांच्याजवळ आला की ते लिहिल्याशिवाय राहत नाहीत. विविध विकासात्मक प्रश्न लेखणीच्या माध्यमातून मार्गी लावलेले दिसून येतात. पत्रकारीतेच्या क्षेत्रात काम करत असताना सत्य बातम्या लिहिण्यात ते कधीच हयगय करत नाहीत.भल्याभल्यांना सळो की पळो करून सोडतात. यात शंकाच नाही.
 पत्रकारांना न्याय देण्यासाठी राज्य भरात नावाजलेल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली चालणारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची २०२० मध्ये लोहा येथे शाखा स्थापन केली. त्या संघटनेची लोहा तालुकाध्यक्ष पदाची धुरा बिनविरोध पणे आजही सांभाळत आहेत. संघटनेच्या अधिवेशनासह राबवलेल्या विविध उपक्रमात ते संपूर्ण टीम ला सोबत घेऊन सक्रिय, उल्लेखनीय सहभाग नोंदवतात.हे करत असताना संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे, राज्य सल्लागार प्राचार्य वसंत बिरादार पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय संघटक बापू गायखर, जिल्हाध्यक्ष संजय कुमार गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतात.शिवराज पाटील यांची लोहा येथील नावाजलेल्या दैनिकांच्या जेष्ठ
 पत्रकारांनी त्यांच्या टीमसह सलग तिसऱ्यांदा लोहा तालुकाध्यक्ष पदाची फेरनिवडीची माळ त्यांच्या गळ्यात घातली.
समाजातील अन्य प्रश्नांसह राष्ट्रपुरुष, महामानवाच्या जयंती, पुण्यतिथी, राष्ट्रीय सण उत्सवातील उपक्रम स्वतः पुढाकार घेऊन टिमकडून राबवून घेत असतात.यामुळेच त्यांना मराठा सेवा संघाच्या कार्याध्यक्षपदी 5 जानेवारी 2022 रोजी विठू भाऊ चव्हाण, बापू गायकर, श्याम पाटील नळगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. तसेच त्यांच्या पत्रकारितेतील कार्याची दखल घेऊन अहमदनगर येथे २०२१-२२ चा सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकारीता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील नावाजलेले जेष्ठ साहित्यिक तथा अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार ,दैनिक वतनवाला चे कार्यकारी संपादक दत्ता भाऊ शेंबाळे, वखार महामंडळ कार्यालय पुणे येथील सेवानिवृत्त अधिकारी बी.एन.सोनटक्के, बुलढाणा बँकेचे अधिकारी के एम शेटे, ज्ञानोबा माऊली यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते. पत्रकारांच्या विविध प्रश्न संदर्भात त्यांनी सदैव तत्पर राहिल अशी त्यांनी वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला ग्वाही दिली.
या संयमी, उच्चशिक्षित, अन्यायाविरुद्ध लढणारा संघर्ष यात्री आणि उपेक्षितांना न्याय देणारा पत्रकारितेतील निर्भीड निपक्षपाती अशा कर्तृत्ववान गुणी पत्रकार शिवराज पाटील पवार यांना तमाम चाहत्यांकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…

●● पत्रकार बाळासाहेब बुद्धे – मो.नं.9860405730 ●●

ताज्या बातम्या