पुणे येथे आयोजीत मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनासाठी नायगांव तालुका पत्रकार संघ रवाना !

[ नायगांव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषद आयोजीत दिनांक १९ व २० नोव्हेंबर रोजी होणा-या पुणे येथील अधिवेशनात सहभागी होण्यासाठी नांदेडच्या नायगांव तालुक्यातील ग्रामीण पत्रकारांना सोबत घेवून नायगांव तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आज रवाना झाले आहेत .

हे अधिवेशन अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले , जेष्ठ पत्रकार कुमार केतकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थीतीत विवीध उपक्रमाच्या माध्यमातून संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने जेष्ठ पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर ,प्रभाकर लखपत्रेवार, मनोहर तेलंग, सय्यद जाफरभाई , तालुकाध्यक्ष गजानन चौधरी , तालुकाउपाध्यक्ष गंगाधरराव गंंगासागरे , सचीव दिलीप वाघमारे, प्रकाशभाऊ हाणमंते , शेषेराव कंधारे , गोविंद टोकलवाड , पंडीत वाघमारे , सुभाषदादा पेरकेवार , मनोहर मोरे , रामप्रसाद चन्नावार , लक्षमण बरगे , प्रकाश महीपाळे , शेषेराव बेलकर , साहेबराव धसाडे , शाम गायकवाड यांच्यासह नरसी , नायगांव , कुंटूर , बरबडा , मांजरम , शंकरनगर परीसरातील पत्रकार बांधव पुणे पिंपरी चिंचवड येथे उपस्थितीत झाले आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या