कुंडलवाडी मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष पदी सिध्दार्थ कांबळे यांची निवड !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधून कुंडलवाडी मराठी पत्रकार संघाची बैठक जेष्ठ पत्रकार सय्यद इस्ताक अली यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीत अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे यांची तर सचिव पदी डॉ. माधव हळदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सदरील कार्यकारणी पुढील प्रमाणे उपाध्यक्षपदी रुपेश साठे,मार्गदर्शक पदी ज्येष्ठ पत्रकार सय्यद इस्ताकअल्ली,ज्येष्ठ पत्रकार एन.जी.वाघमोडे तर सदस्यपदी सुभाष दरबस्तेवार, हर्ष कुंडलवाडीकर, अमरनाथ कांबळे,माजीद नांदेडकर यांची निवड करण्यात आली आहे.वरील कार्यकारिणीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या