शिवराज पाटील पवार यांची पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी तिसऱ्यांदा फेरनिवड !

[ विशेष प्रतिनिधी /रियाज पठान ]
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ व पत्रकारावर वारंवार होत असलेल्या हल्याच्या निषेधार्थ प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने दि.१० फेब्रुवारी रोजी लोहा तहसिलदार कार्यालया समोर काळ्या फिती लावून निदर्शन करण्यात आले व मुख्यमंत्र्यांना लोहा तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले असून अन्यायाच्या विरोधात निर्भीड पणे लेखणी चालवून सर्व सामान्यांना न्याय देणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना सांगितले.
 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लोहा तालुकाध्यक्ष पदी पत्रकार शिवराज पाटील पवार यांची तिसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या आदेशानुसार संघाचे राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड, जिल्हाउपाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक विक्की मंगलकार्यालय पारडी येथे दि.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडली.सदरिल बैठकीच्या अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त कृषी अधिकारी विश्ववांभर मंगनाळे तर पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा संघटक बापू गायखर,जिल्हा उपाध्यक्ष कामाजी अटकोरे, जिल्हा सरचिटणीस इंजि.हरजिंदर सिंग संधू,यांची प्रमुख उपस्थिती होती. 
         सदरील बैठकीत वरिष्ठांच्या आदेशानुसार व उपस्थितांच्या एकमताने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लोहा तालुकाध्यक्ष पदी सलग तिसऱ्यांदा शिवराज पाटील पवार यांची निवड करण्यात आली.तसेच नुतन तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नुतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे- तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, कार्याध्यक्ष प्रदिपकुमार कांबळे, सरचिटणीस संजय कहाळेकर, उपाध्यक्ष मारोती चव्हाण, उपाध्यक्ष तुकाराम दाढेल, सचिव रमेश पवार, कोषाध्यक्ष संतोष तोंडारे, सहसचिव शिवराज दाढेल, प्रसिद्धी प्रमुख शैलेश ढेंबरे, सल्लागार अशोक सोनकांबळे वरील प्रमाणे निवड करण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाकडून तालुका भरात वर्षेभर विविध सामाजिक,शैक्षणिक उपक्रम राबवत महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी वगैरे राबवत अतिशय उल्लेखनीय कार्य करत आहे. सेवा संघाच्या सलग तिसऱ्यांदा लोहा तालुकाध्यक्ष पदी शिवराज पाटील पवार यांच्या निवडीबद्दल व सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यांच्या निवडीबद्दल व सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, मराठवाडा संघटक बापू गायकर, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड, उपाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे आदींसह सामाजिक राजकीय धार्मिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.       
      Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या