आदर्श शाळा खरसई मराठी शाळेचे शिक्षक जयसिंग बेटकर यांना शिक्षण भूषण पुरस्काराने सन्मानित !

[ रायगड म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
म्हसळा महाराष्ट्र राज्यातील दैनिक रयतेचा कैवारी या डिजिटल वृत्ताचा तृतीय वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा पनवेलमध्ये बापूसाहेब डी.डी. विसपुते महाविद्यालय येथे आनंदाच्या वातावरणात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी म्हसळा तालुक्यातील गेली १७ वर्ष दुर्गम व डोंगराळ भागात शैक्षणिक कार्य करून विविध शैक्षणिक उपक्रमात सहभागी होऊन अध्यापनाचे कार्य करत असताना शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, कला ,क्रीडा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे बेटकर सर यांना डिजिटल शैक्षणिक दैनिक वृत्तापत्राच्या वतीने दैनिक रयतेचा कैवारी सन २०२२ चा राज्यस्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार प्राप्त झाला.
 म्हसळा तालुक्यात भापट या गावी जून २०२१ रोजी साने गुरुजी बालभवन वाचनालय ची सुरुवात केली, शाळा, केंद्र,तालुका व जिल्हास्तरावर विविध शिक्षण विभागात उपक्रमात सहभाग, सामाजिक दृष्ट्या चक्रीवादळाच्या आपत्ती वेळी युवा फाऊंडेशन मार्फत म्हसळा तालुक्यात पागळोली , तोराडी ,देहेन नर्सरी या आदिवासी वाडी वर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात सक्रिय सहभाग होता,चालू शैक्षणिक वर्षात ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप वह्या, गुंज संस्थेचे वतीने २०० विद्यार्थ्यांना कापडी दफ्तर व शैक्षणिक साहित्य वाटप असे विविध कार्य म्हसळा तालुक्यात होत असताना या कार्याची दखल म्हणून दैनिक रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्कार वितरण आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र विसपुते, श्रीमती मनीषा पवार उपसंचालक मुंबई विभाग , अनिल बोरनारे , शिक्षक समितीचे अध्यक्ष, सुधीर शेठ कोमसाप अध्यक्ष, सुनीता चांदोरकर उपशिक्षणाधिकारी रा जि प माध्यमिक रायगड, ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षक सेना अध्यक्ष, संपादक शाहू संभाजी भारती, शिक्षक परिषद संघटना अध्यक्ष राजेश सुर्वे, मिठ्ठू आंधळे कार्य. संपादक मासिक रयतेचा कैवारी, जिल्हा प्रतिनिधी शंकर शिंदे, समावेत कुणबी समाज ठाकरोळी विभाग मुंबई अध्यक्ष रमेश शिंदे, उपाध्यक्ष संतोष घडशी, सेक्रेटरी सदानंन आग्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमा प्रसंगी रा जि प शाळा खरसई मराठी या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मांदाडकर आणि मुख्याध्यापक बाळाजी राठोड सर व शिक्षक वृंद शुभेच्छा दिल्या. शिक्षण भूषण पुरस्कार प्राप्त होताच आदर्श व उपक्रमशील शिक्षक जयसिंग बेटकर सर यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या