अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते कोरोना जनजागृती चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण !

(धर्माबाद प्रतिनिधी -नारायण सोनटक्के)

भारत देशाचे माजी गृहमंत्री तथा मराठवाड्याचे भाग्यविधाता कै.शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त काँग्रेसच्या वतीने कोरोना जनजागृती चित्रकला स्पर्धे आली होती. सदरील चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले आहे.

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे जगासह देशातील जनता हैराण झाली होती.सदरील कोरोनाची जनजागृती करण्यासाठी येथील धर्माबाद तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने कै.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आँनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात आले होते.सदरील चित्रकला स्पर्धेत तीन गट तयार करण्यात आले होते.व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यासाठी पारदर्शक पद्धतीने संबंधित व अनुभवी शिक्षकांनी तिन्ही गटातील प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले होते.

सदरील चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके दि.२४ जानेवारी रोजी धर्माबाद येथील जि.परीषद शाळेच्या मैदानावर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आयोजित कार्यक्रमात त्यांचे हस्ते देण्यात आले आहे.व यावेळी सर्व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले आहे.व त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर,माजी आमदार वसंतराव चव्हाण,जि.परीषदेचे अध्यक्षा सौ.मंगलाताई अंबुलगेकर, उपाध्यक्षा सौ.पद्माताई सतपलवार, सभापती संजय अप्पा बेळगे,युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

यात पहिल्या गटातील प्रथम पारितोषिक -इशान उत्तम चक्करवार, दुसरा साक्षी बालाजी नाईकवाड,तिसरा सुमित संजय पाटील व दुसऱ्या गटातील प्रथम पारितोषिक – समृध्दी चंद्रकांत पाटील,शेख सोहेल इस्माईल,तिसरा कु.श्रावणी श्रीनीवास मल्लेपेलू व तिसऱ्या गटातील प्रथम पारितोषिक – साईनाथ मारोती आडे,दुसरा कु.श्रेया श्रीराम उत्तरवार,तिसरा मानव शंकर पाटील यांचा समावेश आहे.सदरील आँनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्ताहारी पाटील चोळाखेकर, स्पर्धेचे आयोजक काँग्रेसचे शहराध्यक्ष ताहेर पठाण, बाजार समितीचे संचालक गोविंद पाटील रोशनगावकर,निलेश पाटील बाळापुरकर, सौ.साधना सुरकूटवार,माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर तोटलोड,गंगाधरोड साय्यारेड्डी,शंकर बोल्लमवार, बालाजी पाटील कारेगावकर,हनमंत नरवाडे,बंडू पाटील बाभळीकर,सुर्यकांत पाटील जुन्नीकर,नरेंद्र रेड्डी बाळापुरकर,मारोती माकणे, पंचायत समितीचे सदस्य सौ.राजश्रीताई मुपडे, कला शिक्षक अस्वार सर,बालाजी कुदाळे सर, यांच्यासह अनेकांनी परीश्रम घेतले आहेत.

ताज्या बातम्या