शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम पाठपुरवा करू – आमदार श्री बाळाराम पाटिल साहेब !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
श्री.बाळाराम पाटिल साहेब आमदार शिक्षक पदवीधर कोकण विभाग यांच्या उपस्थितीत आज न्यू इंग्लिश स्कुल, जुनियर कॉलेज ता.म्हसळा जि. रायगड येथे माध्यमिक शाळा शिक्षक संवाद सभेचे आयोजन करण्यात आले.

या वेळी शे.का.प. कार्यकर्ते संतोष पाटिल, निलेश मादांड़कर, अलीशेठ कौचली, जेष्ठ शे.का.प नेते परशुराम मादांड़कर, मुख्याध्यापक प्रभाकर मोरे. तांबे सर, गन्नी मुलानी उपस्थित होते.

  शिक्षकांच्या अनेक समस्यां विषयी मा.आमदार पाटिल साहेबांना निवेदन आणि संवादाच्या माध्यमातून समस्या मांडण्यात आल्या. कोरोना कारण देऊन शासन अनुदानाचा पुढचा टप्पा द्यायला टाळाटाळ करत आहे. अघोषित असलेल्या शाळांना घोषित करुण आर्थिक तरतूद करण्यासाठी ही टाळाटाळ करत आहे. पण जिथे आर्थिक तरतुदींची गरज नाही असे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यास सुद्धा शासन टाळाटाळ का करत आहे? हे कळत नाही. 20 वर्ष विना वेतन काम करुन ही या शिक्षकांच्या जीवनाला स्थैर्य यावे असे शासनाला का वाटत नाही?  अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा रक्षण लागू झाले पाहीजे‌. व प्रचलित नुसार अनुदान देऊन पुरोगामी महाराष्ट्राच्याच कपाळावरील विनाअनुदानितचा कलंक कायमचा पुसला जावा. फक्त रायगड जिल्ह्या मध्ये पे युनिट कडून अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वेतनाचा जाणिवपूर्वक उशीर केला जातो. त्यांच्या वेतनाचा निधी इतरत्र वळवून शिक्षकांना निधी नाही असे का सांगितले जाते. हा खोटारडे पना आहे. इतर जिल्ह्यांतील अंशतः अनुदानित शिक्षकांचे पगार वेळेवर होत असताना फक्त रायगड जिल्ह्याला निधी कसा कमी पडू शकतो? या विषयी मा.आमदार साहेबांनी लक्ष घालून शिक्षकांची होणारी हेटाळनी व कुचंबणा थांबवावी.अशी विनंती केली गेली.
मा.आमदार साहेबांनी या मध्ये जातीने लक्ष घालून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुक्यातील सर्व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या