पानसरे महाविद्यालय अर्जापुर येथील कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक गोविंदराव बैलके हे 31 वर्ष प्रदीर्घसेवा करून वयोमानानुसार दिनांक 30 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे दिनांक 1 जुलै 1966 रोजी रुक्मीनबाई पांडुरंग बैलके यांच्या पोटी प्रा गोविंदराव बैलके यांचा जन्म झाला, त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती, अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांचे पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेगाव येथे तर पाचवी ते आठवी छत्रपती शिवाजी हायस्कूल हळदा ता कंधार येथे, नववी ते दहावी चे शिक्षण मल्टीपर्पज हायस्कूल वजीराबाद नांदेड येथे पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षणासाठी 1984 ते 1989 च्या दरम्यान पानसरे महाविद्यालय अर्जापुर येथे अकरावी ते पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
1989 ते 1991 मध्ये यशवंत महाविद्यालय नांदेड येथून एम ए अर्थशास्त्र विषयात पदवीत्तर शिक्षण घेतले, त्यानंतर बी एड शासकीय अध्यापक महाविद्यालय परभणी येथे पूर्ण करून 1993 मध्ये ज्या महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर आयुष्याच्या जोडीदाराच्या शोधात असताना 1994 मध्ये शंकर वाघमारे मरवाळीकर यांची पुतणी अनिता वाघमारे यांच्याशी त्यांचा विवाह झाला, विवाह नंतर त्यांना तीन आपत्ती झाली त्यामध्ये डॉ तृप्ती बैलके बी ए एम एस. एम डी, डॉ अनुश्री बैलके एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी कुंडलवाडी, आणि मुलगा आविष्कार बैलके बीसीए चे शिक्षण पुणे येथून पूर्ण करीत आहे.
त्यांनी आपल्या तिन्ही आपत्यांना उच्च शिक्षण देऊन समाजात एक आदर्श निर्माण केले आहे. महाविद्यालयात कौमार्य अवस्थेतील मुलांना अध्यापनाचे कार्य करीत असताना विद्यार्थ्यांनी चुकीच्या मार्गांनी जाऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन करून अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कामही केले आहे. त्यामुळे आज त्यांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर कार्यरत असल्याचे पहावयास मिळत आहे.महाविद्यालयात आपल्या प्रभावी अध्यापणातून विद्यार्थ्यांना आपलंसं करून घेण्याचा हातखंडा असल्यामुळे ते एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून कायम विद्यार्थ्यांच्या मनपटलावर अधिराज्य प्रस्थापित केले आहे.
प्रा बैलके यांच्यावर संस्थेने कुठलेही शैक्षणिक कार्याची जबाबदारी टाकली ते अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडून आपल्या कार्याची एक वेगळी छाप टाकण्याचे काम केले,गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत जिकरीच्या अशा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा अत्यंत नियोजन बद्ध पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन पार पाडण्याचे काम केले. असे प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रा गोविंदराव बैलके सर आज वयोमानानुसार 31 वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत, त्यांच्या निवृत्ती बद्दल त्यांना खूप खुप शुभेच्छा व त्यांचे पुढील आयुष्य आरोग्यमय व सामाजिक,धार्मिक क्षेत्रात जावे अशी मंगलमय सदीच्छा .
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy