आजादी का अमृतमहोत्सव माझा अभियान ; अंतर्गत विविध उपक्रम !

[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
म्हसळा तालुक्यातील रा.जि.प शाळेत आजदी काअमृतमहोत्सव माझा अभियान अंतर्गत विविध कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सावित्रीबाई फुले, जिजामाता, राणी लक्ष्मी बाई यांचा जीवन प्रसंग सादर केला.

रा.जि.प शाळा बनोटी येथील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित प्रसंग सुंदर रित्या सादर केला. मार्गदर्शन शिक्षक श्रीमती सावंत मॅडम यांचे लाभले. रा.जि.प. आदर्श शाळा तोंडसुरे येथील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन प्रसंगावर आधारित नाटिका सादर केली.

शाळेचे मुख्याध्यापक श्री म्हात्रे सर, खटके सर उपस्थित होते. रा.जि प शाळा वरवठणे येथील विद्यार्थानी श्रुष्टि सचिन जाधव ने ‘राजमाता जिजाऊ’ एकपात्री सुंदर नाटिका सादर केली. शाळेचे मुख्याध्यापक श्री किरण पाटिल सर, अमोल बुधवंत, श्रीमती गावित उपस्थित होते. रा.जि.प शाळा साळविंडे देवळाची वाड़ी येथील विद्यार्थानी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली.

यावेळी मुख्याध्यापक श्री.अकोळकर सर, जाधव सर उपस्थित होते. खरसई येथील विद्यार्थानी ही नाटिका सादर करुन वरवठणे केंद्रात आजादी का अमृतमहोत्सव माझा  अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम करुन साजरा करण्यात आला.  या वेळी वरवठणे केंद्रप्रमुख श्री अ.बा.मोरे यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनदंन करण्यात आले आणि नविन वर्षाच्या शुभेच्या देण्यात आल्या.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या