नायगाव पोलीस ठाण्याचे गणपत कोडजी पेदे शेळगावकर पोलीस जमादार यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याने त्यांचे रामतीर्थ ठाण्याचे साहय्यक पोलीस निरीक्षक मारकड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
नायगाव तालुक्यातील शेळगाव छत्री येथील रहिवाशी पोलीस ठाणे नायगाव अंतर्गत कार्यरत असलेले माजरम बिटचे बिट जमादार गणपत कोंडजी पेदे यांची नायगाव येथील पोलीस ठाण्यातच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याचे २७ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे पत्र प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती बहाल करण्यात आली आहे.नांदेड जिल्ह्यात २६ पोलीस जमदाराना पदोन्नती देण्यात आली असून या मध्ये त्यांचा पहिला क्रमांक आहे.
त्यांनी १९९३ पासून आपल्या नौकरी ची सुरुवात पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथून केली आहे १९९८ ते २००३ भाग्यनगर नांदेड, २००३ ते २०१० धर्माबाद, २००७ मध्ये पोलीस जमादार पदोन्नती, २०१० ते२०१५ मुखेड, २०१५ ते २०२२ इतवारा नांदेड , २०२२ ते २०२३ नांदेड ग्रामीण सध्या २०२३ पासून नायगाव ठाण्यात कार्यरत आहेत.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy