प्रेरकांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला ; वाहतुक कोंडीमुळे पोलीस व आंदोलक आमने-सामने !

[ प्रतिनिधी -दिपक गजभारे घुंगराळेकर ]
थकीत मानधनासह विविध मागण्यासाठी प्रेरक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेवर भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला होता.मोर्चेकर्‍याणी जि.प.च्या प्रवेशद्वारावर ठिया मांडल्याने येणारी व जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.वाहतुक कोंडीवरून पोलीस आणी आंदोलन कर्त्यांमध्ये बाचाबीच झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

 

पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी आंदोलनकर्त्यां सोबत चर्चा करून शांत केल्या नंतर वाहन धारकांना रस्ता मोळा करण्यात आला. दरम्यान आंदोलनामुळे रेल्वेस्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

निरक्षर प्रोढांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय अभियान सुरु करण्यात आले. राज्यात 2012 पासून प्रत्यक्षात याची सुरवात झाली. या अभियांना अंतर्गत प्रेरक व प्रेरिकांची ग्राम लोकशिक्षण समिती व तालूका लोक शिक्षण समिती यांच्यामार्फत निवड करण्यात आली.प्रेरकांना 2 हजार रूपचे मानधन देण्यात येत होते. 2018 पासून सदरील योजना बंद केल्यांने प्रेरकांवर उपसमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रेरक संघटनेच्यावतीने प्रेरकांना अंशकालीन दर्जा द्यावा, नविन योजनेत विना अट प्रेरकांचे समायोजन करावे, ऑनलाईन ऑफलाईन सर्व प्रेरकांचे थकीत वेतन द्यावे, यासह आदी मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य साक्षर भारत प्रेरक-प्रेरिका संघाच्यावतीने जिल्हा परिषदेवर भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चा मध्ये नांदेड जिल्हयातील विविध ठिकाणावरून प्रेरक सहभागी झाले होते. दरम्यान प्रेरकांनी काढलेला मोर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात आला असता आंदोलन कर्त्यांनी प्रवेशद्वारा जवळच ठिय्या मांडला. त्यामुळे जिल्हा परिषदेत येणारे-जाणारे वाहन अडकून पडले होते. रस्त्यावरही वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलन कत्यांना रस्त्याच्या कडे सरकवत असतांना पोलीस आणी आंदोलन कर्त्यांमध्ये बसचाबीच झाली. पोलीस निरिक्षक जगदिश भंडरवार यांनी मध्यस्ती केल्यांने आंदोलन कर्त्यांनी रस्ता दिला व वाहतुकीस मार्ग मोकळा झाला.
आंदोलन कर्त्यांच्या शिष्टमंडळांने आपल्या मागण्याचे निवेदन जि.प. प्रशासनाला दिले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष माणिक कांबळे बारडकर, सदाशिव पतंगे, मोहन जाधव, गंगाधर वासणीकर, विशाल भालेराव, दिपक गजभारे, संतोष सुर्यवंशी, पिराजी गाडेकर, गौतम आढाव, सिद्धार्थ हणमंते, माधव वाघमारे, दत्तराम डुबुकवाड, रामेश्वर घोनशेटवाड, नारायण कोसंबे, याच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. वजीराबाद पोलीसांनी चौख बंदोबस्त लावला होता.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या