ग्रामसेवकांच्या विविध मागण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन !

[ नायगांव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
ग्रामसेवकांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी नायगांव पंचायत समिती समोर तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेचे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले हे .या वेळेस मोठ्यात प्रमाणात ग्रामसेवक उपस्थित होते.
गेली आनेक वर्षापासून ग्रामसेवक संघटना विविध मागण्याबाबत आंदोलन, धरणे मोर्चे, उपोषण शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या पुर्ण व्हाव्या म्हणून करत आसते. याचाच एक भाग म्हणून नायगांव तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात समोर २८ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. आदर्श ग्रामसेवक चार वर्षांपासून चा देण्यात यावा . पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांना एक वेतन वाड देण्यात यावी, कामाचा आतिरीक्त भार कमी करणे, गटविकास आधिका-याना निलंबित करण्याचे आधिकार रद्द करण्यात यावे , आशा विविध मागण्याचे निवेदन पंचायत समिती ला देण्यात आले आहे.
या वेळेस बोंडले एस. जे, टी .जी. रातोळीकर, रविराज नव्हारे, उमेश कुमार धोटे , धनराज कत्ते, गणेश बरबडेकर, सुरेवाड बि.टी. नेरलेवाड पी.पी, एरसनवार एन.एस, विठ्ठल कानगुले, जोंधळे एम. के, आगलावे एस.डी, मोरे विधा, गुट्टे एस.बी, मूगटकर एक.बी. साईनाथ चव्हाण आदी ग्रामसेवक धरणे आंदोलनात सहभागी होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या