उपजिल्हाधिकारी कार्यालय धर्माबाद येथे दिव्यांग, वृध्द, निराधार, गायरान पट्टेधारक, यांच्या अनेक प्रश्नासाठी दि २९ जुलै २०२२ मोर्चात सहभागी व्हा – चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर
उपजिल्हाधिकारी कार्यालय धर्माबाद येथे दिव्यांग, वृध्द, निराधार, गायरान पट्टेधारक, यांच्या अनेक प्रश्नासाठी दि २९ जुलै २०२२ मोर्चात सहभागी व्हा – चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर
दिव्यांग, वृध्द, निराधार, गायरान पट्टेधारक, शेतमजुर शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नासाठी दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ व महाराष्ट्र अखिल भारतीय किसान मजदुर सभा यांच्या वतीने भव्य मोर्च्या २९ जुलै २०२२ रोजी दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, केंद्रिय सचिव अशोक घायाळे, राजेश्वर पालमकर यांच्या नेत्रत्वाखाली खालील मागण्सासाठी आयोजित करण्यात आला आहे.
हा मोर्चा अतिपाऊस असताना सुध्दा आयोजित केला असुन दिव्यांग, वृध्द, निराधार यांना एक महिन्यापासुन अतिपाऊस असताना चार महिन्यापासुन अनुदान नाही. शेतकऱ्यांना कोणतिही मदत नाही. अशा विविध प्रश्नाचे निवेदन देऊन मोर्चाने शासन, प्रशासन, जागे करण्यासाठी राज्याचे मा.मुख्यमंत्री महोदय यांना ऊपजिल्हाधिकारी धर्माबाद यांच्या मार्फत निवेदन सादर करून न्याय मिळावा म्हणुन सर्वांनी पावसाची तमा न करता संघटितपणे संघर्षासाठी मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले आहे.
● खालील मागन्या ●
१) या राज्यातील दिव्यांग, वृध्द निराधारांना कोणताच आधार नाही व ते कोणतेहि काम करू शकत नाहीत अशांना दरमहा एक हजार मिळनारे अनुदान चार ते पाच महिने दिले जात नाहि, व त्या अनुदानात दोन वेळेचा चहासाठी दुध ही मिळत नाहि? तेहि चालु असलेल्या लाभदारकांना दरवर्षी कुंटुबाचे एकविस हजाराचे ऊत्पन्नाचे, ह्यात प्रमाणपत्र, ईत्यादी कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दिव्यांग, वृध्द, निराधारांना ऊत्पन्नाची अट रद्द करा.
२) जसे राज्यातील मंत्री, आमदारांना लाखो रू. ऊत्पन्न असताना त्यांना कोणतिही अट का नाही ? दिव्यांग, वृध्द, निराधार दरमहा हजार रुपयासाठी तिजोरीत पैसे नसल्यामुळे चार ते पाच महिने पैसे मिळत नाहित. लोकप्रतिनिधींच्या वेतनासाठी राज्यावर हजारो कोटि रुपये कर्ज असताना साठ हजार कोटि रूपयाचे कर्ज घेऊन त्यातील तिस कोटि रूपये माजीमंत्री, आमदार यांच्या निवृतीवेतनाच्या पेशंन विधेयकाला मंजुरी दिली जाते दिनदुबळ्यांना मानधनात वाढ का होत नाहि ? ती वाढ करावी.
३) महाराष्ट्रात अतिवृष्टीने सत्तर टक्के नुकसान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहिर करून हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या.
४) तेलंगना राज्याप्रमाणे खरीप व रब्बी हंगामासाठी हेक्टरी तिस हजार रू अनुदान द्या.
५) रास्त दुकानात दिव्यांग, वृध्द, निराधाराचे अंगठा येत नसल्याने राषण व अनुदान ऊचल करता येत नसल्यामुळे व्हिडीओ, तथा बायोमेट्टिक ने पुरवठा करा.
६) दिव्यांग कायदा २०१६ ची कठोर अंमलबजावणी करा.
७) दप्तर दिंरगाई कायद्याप्रमाणे दोषी अधिकारी यांच्यावर कठोर कार्यवाही करा.
८) दिव्यांग बांधवाना ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरीषद यांच्या दिव्यांग पाच टक्के निधी न देणा-यावर योग्य ती कार्यवाहि करा.
ईत्यादी मागण्यांसाठी धर्माबाद तालुक्यातील दिव्यांग, वृध्द, निराधार, गायरान पट्टेधारक, शेतमजुर यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालय धर्माबाद येथे दि २९ मार्च २०२२ रोजी नटराज टॉकी चौक धर्माबाद येथे सकाळी ११ वाजता जमावे तेथून मोर्चा निघेल .
मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉ.पि.डी वासमवार, बळीराम तोटावार, चंपतराव डाकोरे पाटिल, अशोक घायाळे, मानेजी पाटिल, निरंजनाबाई रापतवार, सविता बोबंले, श्रीराम जंगदबे, गंगाधर जगदबे , ईत्यादी कार्यकर्ते ऊपस्थित असतील अशी माहिती चंपतराव डाकोरे यांनी दिली आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy