“जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे हजारोच्या संख्येनी सहभागी व्हावे असे बिलोली ता.अध्यक्ष बालाजी होनपारखे यांच आवाहन !!”
दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र व अखिल भारतीय किसान मजदूर सभा,लोकशक्ती संघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त पणे दिव्यांग, वृध्द, निराधार यांच्या २९ मार्च २२ च्या धरणे आंदोलनास जाहिर पांठिब्यासाठी व दिव्यांगांच्या, वृध्द निराधार, गायरान पट्टेधारक, आदिवासी यांच्या अनेक प्रश्नासाठी शासन प्रशासन जागे करण्यासाठी दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, केंद्रीय सचिव काॅ.अशोक घायाळे, लोकशक्ती संघर्ष मोर्चा संस्थापक अध्यक्ष मा राजेश्वर हतिअंबिरे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी, शासन प्रशासन जागे करण्यासाठी, महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे एल्गार मोर्चात सहभागी होऊन शासन प्रशासन यांच्या विरोधात संताप व्यक्त करावा असे आवाहान दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले यांनी केले.
ज्या दिव्यांग, वृध्द, निराधार यांना जिवन जगण्यासाठी शासन दरमहा एक हजार रूपये देते त्यात दोन वेळा चहासाठी दुध तरी मिळते काय? ते कसे जीवन जगतील हे लोकप्रतिनिधी प्रशासन यांना लक्षात येत नसेल काय? लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांना लाखो रूपये मिळताना त्यांचे कुटुंब चालत नाही म्हणून वेतन वाढ केली जाते तर दिनदुबळ्यांना का वाढ होत नाही? दिव्यांगांना मिळणारा कोणताही निधी चार ते सहा महिने मिळत नसेल तर ते कसे जगत असतील? त्यांचे दु:ख लोकप्रतिनिधी प्रशासनास कधी लक्षात येतील?
दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनो जागे होऊन संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय काहि मिळत नाही. म्हणून सर्वानी संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय काहि मिळत नसल्यामुळे आपले संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना शिष्टमंडळ सहित भेटुन चर्चा करून २०१९ पासुन प्रलंबित प्रश्न का सुटत नाही यांचे लेखी ऊतर मिळावे म्हणून १४ फ्रेबुवारी पासुन निवेदन देऊन सुध्दा दिलेल्या निवेदनाचे साधे ऊतर न देणार्या प्रशासन याच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी धरणे व मोर्चा त सहभागी व्हावे. असे आवाहान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल काँ.अशोक घायाळे, राजेश्वर पालमकर नागोराव बंडे, राजु शेरकुरवार, बिलोली ता.अध्यक्ष बालाजी होनपारखे, शंकर म्हैञे, श्रीरामे राजू,, गोपाळ अडबलवार, व्यंकट टेकाळे, प्रकाश सुरकुटलवार किसन चुनुमवार, रामलु मोगरेवार इत्यादि ता.बिलोनी प्रसिद्ध प्रमुख राजेंद्र शेळके यांनी केले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy