वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या माध्यमातून वाढत असलेल्या महागाईच्या विरोधात निषेध व आंदोलन करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दिनांक 21 रोजी बिलोली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बिलोली तहसीलदार यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

पेट्रोल, डिझेल, गॅस आदी वस्तूची महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केंद्र सरकारने वाढत असलेली महागाई तात्काळ संपुष्टात आणावी यासाठी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष रणजीत पाटील हिवराळे, तालुका उपाध्यक्ष निळकंठ पाटील दूडले, कुंडलवाडी युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे, तालुका सहसचिव शिवाजी पंदीलवार, बिलोली युवक शहराध्यक्ष जम्मू खान पठाण, गोविंद पाटील नरवाडे, गणेश पाटील नरवाडे, चक्रधर पाटील, हनमंत पाटील कदम, आदीसह अनेक राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या