दिव्यांगांसाठी स्वतंञ मंञालय व विभाग तयार करावा यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आक्रमक ।

  • जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे ठिया धरणे आंदोलन !
[ धर्माबाद ता.प्रतिनिधि – चंद्रभीम हौजेकर ]
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नांदेडच्या वतिने मा. मंगनाळे विठ्ठलराव जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिव्यांगांसाठी स्वतंञ मंञालय व विभाग तयार करावा तसेच दिव्यांग बांधवाचा मागण्यांसाठी एक दिवसाचे ठिया धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
त्या धरणे आंदोलनासाठी मा.विठ्ठलराव देशमुख जिल्हा प्रमुख, मा.प्रितपाल सिंघ शाहु नांदेड शहर प्रमुख, मा.गणेश हांडे, जनशक्ती पक्ष आणि कांचावार मॅडम, तसेच मा.श्रीराम पवार जिल्हाध्यक्ष नांदेड (दक्षिण) अनिल कांबळे, गोपिनाथ मुंडे, तालुक्यातुन आलेले तालुका अध्यक्ष अनिल शेट्टे पा.साइनाथ बैनवाड नायगांव, किशोर हुडेकर माहुर, भगवान मारपवार किनवट, दस्तगीर शेख कंधार,हानमंतू ढगे भोकर,हानमंत सिताफुले बिलोली, राहुल हंकारे लोहा, संग्राम आंगडे देगलूर,कल्याणकर भाऊ हदगाव,माधव पांचाळ धर्माबाद,शाईनाथ पाटील जुन्नीकर, महिला अध्यक्षा केशरताई शिंदे पा, आशाताई रेड्डी, शांताबाई चिंतंले, संगीता बामणे, पार्वती गोबाडे, विजयालक्ष्मी नंदनवार, संगीता स्वामी, माहूर च्या ताई, पुरुष पदाधिकारी व महिला पदाधिकारी व तसेच प्रहार सैनिकांनी आदी शेकडो दिव्यांग बांधव निराधार महिला उपस्थित होते. सर्व प्रहार दिव्यांग बांधव आंदोलनात उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या