दिव्यांग आयूक्त पुणे येथे दि.८ फ्रेबू.२०२३ ला दिव्यांगाच्या अनेक प्रश्नासाठी बोंबाबोंब धरने आंदोलनाची दखल दिव्यांग आयुक्त घेतील काय – चंपतराव डाकोरे पाटिल

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
दिव्यांगाःना शासन प्रशासन यांच्याकडुन दिव्यांग कायदा २०१६ ची कलम ९२ ची अंमल बजावणी होत नसल्यामुळे दिव्यांग, वृध्द, निराधार, मित्र मंडळ महाराष्ट संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेत्रत्वाखाली शिष्टमंडळानी दिव्यांग आयूक्त पुणे येथे बौंबाबोम धरणे आंदोलनात दिव्यांग आयुक्त साहेब यांनी शिष्टमंडळासोबत पंधरा प्रश्नावर चर्चा करुन निवेदन स्विकारून संबधितास आदेश देऊन प्रश्न सोडविण्याचे अश्वासन दिले.

ज्या दिव्यांगाना चालता येत नाहि, बोलता येत नाहि, ऐकु येत नाहि, दिसत नाहि अशा विविध प्रकारच्या दिव्यांगाना न्याय हक्क मिळावा म्हणुन भारत स्वंतत्र झाल्यापासुन अनेक दिव्यांग कायदे करण्यात आले पण देश स्वतंत्र होऊन पंच्याहात्तर वर्षात आजहि दिव्यांगाना न्याय हक्क मिळत नसल्यामुळे मा. पंतप्रधान यांनी दिव्यांग कायदा 2016 ची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणुन दिव्यांग कायदा करून  अंपग शब्दाऐवजी दिव्यांग शब्दाने मान सन्मान दिला. जर कोण पांगळे, लंगडे, अंधळे म्हणुन हिन वागणुक दिल्यास, त्यांना हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्यास दिव्यांग कायदा २०१६ प्रमाणे कलम ९२ प्रमाणे गुन्हा नोंदवुन कडक क्षिक्षेची तरतुद करण्याचा शासन निर्णय असुन त्यांची अंमल बाजावणी महाराष्टृत होत नसल्यामुळे दिव्यांग बांधवाना शासन दरबारी न्याय मिळावा म्हणुन नाईलाजाने जन आंदोलन करावे लागते.

न्याय तर मिळत नाहि पण साधे ऊतर मिळत नसल्यामुळे ऊपोषण, मोर्चे, धरने आंदोलन करावे लागते. त्यात सोलापुर जिल्हयात ऊपोषणात एका दिव्यांगाना जिव गमावला लागला, तर दिव्यांग वस्तीगृहात मंतीमंद दिव्यांगाना चटके देण्यात आले . नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील कुंचेली येथे दिव्यांगाच्या जमीनीवर गैर अर्जदार यांच्याकडे कोणताहि पुरावा नसताना अतिक्रमण करण्यात आले. त्या दिव्यांगानै जुन २०२२ पासुन प्रशासन, लोकशाहि दिनी अकरा महिन्यापासुन व वारंवार चकरा मारुन न्याय मिळाला नाहि.

तसेच कंधार तालुक्यातील दहिकळंबा येथील दुधकवडे तुळशिराम दिव्यांगाच्या घराच्या जागेवर अतिक्रमण केले ते सुध्दा लोकशाहि जनता दिनी व संबधितास न्याय मिळाला नाहि. मुखेड तालुक्यातील मांजरी येथील दोन्हि डोळ्याने अंध असणारे दिव्यांग गुरूबस रेवन अप्पा, वैजनाथ आळे व गावातील मंजुर, शेतकऱ्याना गावातील माजी पोलिस पाटिल यांनी नकाशात असलेला रस्ता बंद करून दिव्यांगाना मारहान करून सुध्दा दिव्यांग कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद केला नाहि. हदगाव येथील सिबदरा म. येथील अंध दिव्यांगाच्या जमिनीत तुकडेबंदि एकत्रिकरण योजनेत गटाची अदलाबदल प्रशासनाच्या चुकिमुळे झाल्यानंतर ते दुरूस्त करून न्याय द्यावा म्हणुन वर्षापासुन प्रयत्न करुन प्रशासन न्याय दिला जात नाहि.नसेल तर दिव्मांग कायदा कशासाठि ?अशा अतिक्रमण करणाऱ्या आरोपिला दिव्यांग कलम प्रमाणे गून्हा नोंद करुन क दिव्यांग कायद्याची कठोर अमलबजावणी करावि.
२) दिव्यांग साहित्य व पायाभूत साधने शिबीर
नांदेड जिल्ह्यातील डिसेंबर 2019 मध्ये दिव्यांगासाठी पायाभूत साधने व साहित्य मोजमाप शिबीराचे आयोजन करून लाखो रुपये खर्च करण्यात येऊन अनेक दिव्यांगाना साहित्य आजहि पंचायत समितीने पुर्णपणे वाटप केले नसल्यामुळे शाळेच्या पटांगणात गंजुन गेले आहे. ते वेळेवर वाटप व्हावे म्हणुन अनेक वेळा निवेदन दि २९, मार्च 2022 ला जिल्हाधिकारी कार्यालयसमोर दोन दिवस धरने, आंदोलन मोर्चा करूनहि दखल घेतली नाहि. ते वाटप व्हावे म्हणुन दहा महिने पाठपुरावा करुन लाखो रूपयाचे साहित्य त्या दोषि अधिकाऱ्या कडुन वसुल करून दिव्यांगाना तात्काळ साहित्य द्यावे दोषि अधिकारी यांच्यावर कार्यवाहि करावी. अशा घटना भविष्यात होऊ नये म्हणुन दिव्यांग कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कार्यवाहि करावी म्हणुन आपल्या हक्कासाठी पंधरा प्रश्नासाठी जास्तीत जास्त दिव्यांगानी संघटिपणे आंदोलनात सहभागी झाले.
दिव्यांग वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल महाराष्टृ सचिव मनोज कोटकर, जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, राजुभाऊ शेरकूरवार, अनिल रामदिनवार, बालाजी व्होनपारखे, दतात्रय सोनकांबळे,आळे वैजनाथ,शिवपुजे बसवअप्पा, हेमत आडे, शंकर म्हैत्रे, चव्हाण चांदराव, नरवाडे सागर, शेख, समीर, विठ्ठल बेलकर ईत्यादी कार्यकर्त नी निवेदनद्वारे केली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या