बिलोली पुरवठा विभागाने माचनुर यथील स्वस्त धान्य दुकानदारा विरूद्ध कोणतीच कारवाई न केल्याने तहसिल कार्यालयावर दवंडी मोर्चा धडकला.

माचनूर येथील स्वस्त धान्य दुकानदाराने धान्य वाटप केले नाही तर बिलोली तहसील प्रशासनाच्या विरोधात गाढव मोर्चा काढण्यात येईल असा दवंडी मोर्चात इशारा देण्यात आला.

[ बिलोली ता.प्र – सुनील जेठे ]
बिलोली तालुक्यातील मौजे माचनुर येथील स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिका धारकांना नियमीत धान्य वाटप करत नाही म्हणून कार्डधारकांनी सामजिक कार्यकर्ते व सरपंच प्रतिनिधी यांच्या सहकार्याने पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार निलावड यांच्या भ्रष्ट कारभाराची तात्काळ चौकशी लावून दोषी अधिकारी वर फौजदारी गुन्हा दाखल करणे बाबतची तक्रार बिलोली तहसीलदार यांच्याकडे देण्यासाठी दि.५ एप्रिल रोजी तहसिल कार्यालयावर दवंडी मोर्चा काढला.

सदर माचनूर येथील ग्रामस्थ नागरिकांनी 29 /03 /2023 रोजी पुरवठा विभागाच्या बाबतीत तक्रार दिली होती पण त्या तक्रारीचे निवारण पुरवठा अधिकाऱ्यांनी केले नसल्यामुळे तहसील प्रशासन व पुरवठा विभागाचा जाहीर निषेध करण्यासाठी दवंडी मोर्चा तहसील कार्यालया समोर धडकला. या दवंडी मोर्चात भूमीहीन व आर्थिक दुर्बल घटकांचे लोक आपल्या हक्काच धान्य मिळावे म्हणून हा दवंडी मोर्चा काढून पुरवठा विभागाचा निषेध केला.
 “आम्हाला आमच्या हक्काच धान्य गेल्या अनेक महिन्यापासून मिळत नाही. आता तरी आमचे धान्य व आनंदी शिधा वाटप करण्यात यावं म्हणून आम्ही प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर येत्या काही दिवसात आम्ही गाढव मोर्चा काढून पुरवठा विभागाच्या व तहसीलदार यांच्या चेंबर मध्ये घुसणार. असे आम्ही या ठिकाणी बोलत नाही तर करूनही दाखवणार असे मोर्चे करू महिला व कार्यकर्ते मुकिंदर कुडके, राजेश मनोरे म्हणाले”.
 सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील हांडे हे बोलताना म्हणाले, मी आणि माझी संघटना आपल्या पाठीशी आहे.
धान्य पुरवठा विभागातील नायब तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी म्हणून निवेदन देण्यात आले. निवेदनावर राजेश मोतीराम मनुरे, शेख अब्दुल, साखरे शिवराज, अविनाश परसुरे, शेख उस्मान पाशा, अविनाश पाटील, दिगंबर पालचेवार, प्रकाश नांगरे, गंगुबाई नागोराव, महादाबाई चरके, आमशाबाई मैत्री, राजश्री डोंगरे यांच्यासह अनेक शिधापत्रिकाधारकांनी स्वाक्षरी केली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या