प्रेरकांचा प्रलंबित मागण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी आक्रोश मशाल मोर्चा ; थकीत मानधनासाठी संघटना आक्रमक !

[ प्रतिनिधी – दिपक गजभारे ]
नांदेड प्रेरक जिल्हा संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्या त्वरित मंजूर करण्यासाठी तसेच एक वर्षापासून शिक्षण सेवेसाठी आहोरात्र मेहनत घेणाऱ्या प्रेरक/प्रेरीका यांना मानधन मिळत नाही. उपासमारीची वेळ आली असून विविध मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 10 ऑक्टोबर सोमवार रोजी आक्रोश मशाल मोर्चा जिल्हा परिषदेवर काढण्यात येणार असल्याची प्रेरक संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक कांबळे बारडकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले असू त्यासंदर्भात राज्य शासनाला लेखी निवेदन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात बऱ्याच वर्षापासून शिक्षनापासून वंचित असलेल्या निरक्षर तसेच अडाणी नागरिकांना शिक्षण मिळावे या उद्देशाने कालबध्द राष्ट्रीय साक्षरता अभियान शासनाच्या वतीने राबविले जात होते. प्रौंढ निरक्षरांना औपचारिक शिक्षण मिळाले नाही.  त्यांच्यासाठी शिक्षण रात्रीचे वर्ग सुरू करून साक्षर अभियान हि राबविले होते. यानंतर सन २०१२ पासून साक्षर अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रेरक/प्रेरीका यांची निवड करण्यात आली होती.
केंद्र शासनाच्या वतीने दरमहा दोन हजार अल्प मानधन दिले जात होते. यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शिक्षण सेवेच्या माध्यमातून रोजगार मिळाला होता. परंतु केंद्र शासनाने सन २०१८ मध्ये योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
केंद्र व राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य साक्षर भारत प्रेरक/प्रेरीका संघ यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात लक्ष वेधन्यासाठी दिनांक १० सोमवार दुपारी एक वाजता अण्णाभाऊ साठे चौकातून आक्रोश मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.
सदर मोर्चा प्रेरक संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक कांबळे बारडकर यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात येणार आहे. प्रेरक संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये अंशकालीन कर्मचाऱ्याचा दर्जा बहाल करण्यात यावा, नवीन योजनेत विनाअट सामावून घेण्यात यावे, थकीत मानधन तत्काळ देण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे लेखी निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षणधिकारी यांना देण्यात येणार आहे.
या मोर्चात जिल्ह्यातील प्रेरक/प्रेरीका व समविचारी संघटना यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष माणिक कांबळे, पिराजी गाडेकर, सदाशिव पतंगे, मोहन जाधव, प्रभाकर व्यवहारे सर, शहाजी पाटील शिंदे, पांडुरंग चिकलभोसिकर, शिवराज पाटील पवार, इलियास शेख, गंगाधर वासनिकर, फेरोज पटेल, चंद्रकांत तुरे, उध्दव चौंडे, भास्कर शिंदे, मसाजी वाघमारे, संतोष दोडके, दिपक गजभारे घुंगराळेकर, नारायण कोसंबिकर, नारायण कोसंबे, बाबाराव माने, माधव वाघमारे, सिध्दार्थ हणमंते, गौतम आढाव, मारोती सोनकांबळे, ग्यानेद्र चिंचोलीकर, आत्माराम राजेगोरे, विनोद शिरसाठ, नवाब पिंजारी, मुनेश्वर संघापाल, विशाल भालेराव, सुरेखा केंद्रे, पार्वती केंद्रे, आशाताई जाधव, मंजुळा सोनकांबळे, संगीता दादजवार यांनी केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या