अमानुल्लाखान खाजाखान स्वस्त धान्य दुकाना विरोधात तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा ; दुकानदार विरुध्द तक्रार करण्यासाठी पुरवठा अधिकारी उत्तम निलावाड यांना घेराव !

● या तक्रारी संबंधात मा.जिल्हाधिकारी लक्ष देतील का – जनतेचा सवाल ?

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )

बिलोली शहरातील नायकवाड़ी गल्ली येथील स्वस्त धान्य दुकान क्र.10 मशीन क्र (151114600125) असलेले दुकानदार अमानउल्ला खान खाजा खान हे आपली मनमानी करत शिधापञिका कार्ड धारकांना धान्य वेळेवर देत नसल्यामुळे कार्ड धारकांनी दुकानदारा विरुध्द तक्रार करण्यासाठी दि.५ डिसेंबर रोजी तहसील कार्यालया वर भव्य मोर्चा काढून मा.तहसीलदार यांना निवेदन दिले.
सदरिल स्वस्त धान्य दुकान धान्य वाटप करण्यासाठी दोन दिवस उघडे ठेऊन तिसऱ्या दिवशी दुकान बंद केले जाते. कारण दुकानदार हा तेलांगाना राज्यातील निर्मल जिल्ह्यात राहत असल्यामुळे दुकान दोन दिवस चालू ठेवून तिसऱ्या दिवसअखेर पासुन दुकान बंद करुन तेलंगात जाण्याची घाई करत असल्याने कार्ड धारकांना दुकानाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
अमानुल्ला खान खाजा खान हे तेलंगाना राज्यात निर्मल जिल्ह्यात स्थलांतरित झालेली व्यक्ती आहेत. हे तेलंगाना राज्याचे राहीवासी होऊन तिकडेही शासकीय सुविधा घेणारे व्यक्ति महाराष्ट्र राज्याचे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान कसे चालवत आहेत? कोणत्या नियमानुसार ? असा सवाल मोर्चात उपस्थित करण्यात आला.
सदरच्या दुकानदारा बद्दल सखोल चौकशी करुन योग्य कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. शिधापञिका धारकांना नियमितपणे वेळेवर स्वत धान्य मिळण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा असे मोर्चेकरी म्हणाले. 
भव्य मोर्चातील गोर गरीब लाभार्थी कार्ड धारकांसह सामाजिक कार्यकर्ता इंद्रजीत तुड़मे, हेमंत पटाईत, सिराज पटेल, मुस्ताक शेख, प्रकाश मुकडे, बाबू रेड्डीवार, अजिंक्य जकले, मनोहर पटाईत, शेख महेबुब, मनोहर नुगुरवार, सुनील, लक्ष्मी बाई खंडेराय, शिल्पा मुकडे, नरसू बाई तोटलवार, ताराबाई मुकडे, हनमा बाई मुकडे, छोटू मियाँ, शिवाजी रेड्डीवार, विजय मूंडकर, अनिल गादगे, फिरोज खान, शंकर आश्मोड, शेख पाशामिया, रमेश शंखपाळे, पिराजी शंकपाळे, साईनाथ तोटलवार, शेख अजीम, अशोक मुकडे, गंगाबाई पूडगे, लक्षीबाई रोडोड, दीपा मुकडे, सायन्ना आश्मोड, पद्मिनी बाई चुनड़े, लक्षीबाई खंडेराय, गणेश खंडेराय, इरवन्त गादगे, शेख हैदर, शहनाज बेगम, शेख रुस्तुम, मोहन पटाईत यांच्या सह अनेक लाभार्थी स्वाक्षरी केलेले निवेदन घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या