प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने पंचायत समिती समोर पुंगी बजाव आंदोलन केल्याने अखेर गटविकास अधिकारी यांनी दिव्यांग यांना साहित्याचे वाटप केले !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
नायगाव पंचायत समितीच्या स्तरांवर धुळखात पडलेले साहित्य वाटप करण्याची मागणी करुनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने (ता. २७) रोजी पंचायत समितीच्या समोर पुंगी बजाव आंदोलन करण्यात आले असून महत्वाच्या मागणीसाठी दिव्यांगांनी केलेले आगळ्यावेगळे आंदोलन लक्षवेधी ठरले आहे.

आंदोलनाची दाखला घेऊन पात्र दिव्यांगाना गटविकास अधिकारी यांनी साहित्याचे वाटप केले. नायगांव तालुक्यातील दिव्यांग वयोश्री (ता. २३) डिसेंबर २०१९ रोजी सामाजिक न्याय अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिमको) जिल्हा प्रशासन नांदेड, जिल्हा पुर्नवसन केंद्र जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने. दिव्यांगासाठी कृत्रीम अवयव सहाय्यक उपकरणे व वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नारिकांराठी विविध साधने साहित्यासाठी तपासणी करून दिव्यांग वयोश्री लाभार्थी यांना साहित्य वाटप करण्यात आले. मात्र काही दिव्यांग वयोश्री लाभार्थीने साहित्य घेवून न गेल्याने किंवा त्याच्या पर्यंत प्रशासनाने माहिती न दिल्याने वंचित राहिले होते. त्या व्यक्तीच्या साहित्य सन २०१९ पासून पंचायत समिती नायगाव येथे गंजलेल्या अवस्थेत धुळखात पडून आहे. सदरील बातमी दैनिक देशोन्नती प्रकाशित केले होती 
     गंजलेल्या अवस्थेतील साहित्य तर दिव्यांगाना वाटप करण्यात यावेच पण १९९५ अंपग कायदयाची अमलबजावणी करण्यात यावी, दिव्यांग बाधंवाची ग्रामपंचायत रजिस्टरला नोदंणी करावी, दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी २०० चौ. फुट जागा उपल्बध करून द्यावी, ३ टक्के व ७ टक्के १४ व्या व १५ व्या वित्त आयोगाचा निधि व ग्रामपंचायत त्वरीत वाटप करण्यात यावे, दिव्यांग बाधंवाना घर पटी नळपटी करा मध्ये ५० टक्के सवलत देणे, दिव्यांग बाधंवाना बिना अट घरकुलाचा लाभ देणे, गायरान जमीनीचे पट्टे दिव्यांगांनच्या नावावर करने, पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेची अमलबजावणी करणे त्याचबरोबर संजय गांधी निराधार समितीवर दिव्यांग व्यक्तीची निवड करण्यात यावी यासह विविध १५ मागण्या गटविकास अधिकारी यांचेकडे करण्यात आले होते.
     केलेल्या मागण्यांची पुर्तता न केल्यास पंचायत समितीच्या समोर पुंगी बजाव आंदोलन करण्याचा इशारा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. पण दिव्यांगाच्या एकाही मागणीची गटविकास अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने सोमवारी नायगाव पंचायत समितीच्या समोर पुंगी बजाव आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनाची व देशोन्नतीच्या पेपरची दखल घेऊन गटविकास अधिकारी यांनी पात्र दिव्यांगांना साहित्याचे वाटप केले यावेळी गोपाळ आंबटवाड, राजेश बेळगे, मारोती मंगरुळे, माधव कोसंबे, रामदास भाकरे, चांदू आंबटवाड, सुधाकर पांचाळ, हनमंत तमसुरे, लक्ष्मण तमसुरू,संभाजी चव्हाण, अशोक वन्ने, विश्वांभर बोयाळ यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या