पोलिस उपनिरिक्षक पदी आकाश माळगे यांची निवड झाल्या बद्दल बिलोली शहरात स्वागत मिरवणूक
[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
बिलोली तालुक्यात तील मौजे शेवाळा गावाचे भुमीपुञ आकाश माळगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (M,P.S.C) २०२० च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असता पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल बिलोली शहरातील मिञमंडळाच्या वतीने स्वाॕगत मिरवणूक दि.८ जुलै रोजी काढण्यात आले.
सदर आकाश शंकरराव माळगे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने बिलोली शहराती मिञपरिवारात व नातेवाईकामध्ये आनंद झाल्याने बिलोली शहरात मिरवणूकीचे आयोजन करुन घटनेचे शिल्पकार डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुतळ्यास आकाश माळगे यांनी आपल्या हस्ते पुष्प हार टाकून अभिवादन केले,
तदनंतर सेवानिवृत्त शिक्षक शंकरराव माळगे यानी दोन मुलाना उच्च शिक्षण देऊन एक इंजिनियर तर दुसरा पोलिस उपनिरीक्षक झाले म्हणून साठेनगर येथील समाज मंदिर येथे माजी नगराअध्यक्ष भिमराव जेठे यांच्या वतीने पिता पूञाना अभिनंदनाची शाॕल पुष्पहार टाकून स्वागत सत्कार केला.
यावेळी विजयकुमार गायकवाड (शिक्षक),चंद्रकांत कुडकेकर, मुकिंदर कुडके, शिवाजी गायकवाड ,बाबू कुडके,आकाश गाडेकर,संदिप कटारे,मार्तड जेठे,हर्ष सोनकांबळे,संजय कुडके,नागोराव जेठे यांच्या सह शेवाळातुन मित्र मंडळ व साठेनगर जयती मंडळ उपस्थित होते, पोलीस उपनिरीक्षक माळगे यांच्या निवास्थानी अभिनंदन स्वागत मिरवणूकीचा समारोह करण्यात आला असता आकाश माळगे यानी सर्व मिञपरिवार व नातेवाईकाचे आभारमानले….
Www.massmaharashtra.com