खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे ईदगाह विकासासाठी निधीची मागणी !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
जिल्हाचे लोकप्रिय,विकासाभिमूख खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे शहरातील मुस्लीम ईदगाहचा खुंटलेला विकास साधण्यासाठी निधी उपलब्ध करू देण्यात यावे.आशा आशेचे निवेदन शहरातील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अफजल यांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर बिलोली भाजप तालूका अध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे यांच्या उपस्थितीत दिले.
दिलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले की, शहरातील मुस्लिम अल्पसंख्यांक समाजासाच्या ईदगाहाची मालकी जागा जवळपास 15 एक्कर असून याठिकाणी मुलभूत सेवा आभावी नागरीकांना अनेक अडचणीस तोंड द्यावे लागत आहे.
तरी या ठिकाणी ईदची नमाज अदा करण्यात येणार्या प्रार्थना स्थळी टिनशेड उभारण्यात यावे,मुख्य गेटपासून प्रार्थना स्थळा पर्यंत सि.सी.रस्ता बांधकाम व अंतर्गत सी.सी.रस्ते बाधकाम करणे, ईदगाह येथे वृक्षारोपण करणे, स्वच्छालय, वजूखाना बांधकाम करणे, इंधन विहीर व विद्युत मोटार बसविण्यात यावे.उत्तर व दक्षिण बाजूचे सुरक्षाभिंत बांधकाम करण्यात यावे.आदी विकासकामे करण्यासाठी आपल्या खासदार निधीतुन दोन ते तीन कोटी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शहरातील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद अफजल यांनी एका निवेदनाद्वारे केली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या