पूरग्रस्त गावाची पुनमताई पवार यांच्या कडून पाहणी 

( नायगाव तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी )
नायगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावचा संपर्क तुटला होता .तसेच घरांची पडझड झाली व शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे महीला मोर्चाच्या प्रदेश सचिव सौ.पुनमताई राजेश पवार यांनी शनिवारी पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतक-यांना पुनमताई पवार यांनी धीर देत झालेल्या नुकसानीची माहीती आ.राजेश पवार यांना देईन व नुकसानभरपाई लवकर भेटून देण्यात येईल असे सागितले .
गेल्या चार दिवसापूर्वी नायगाव तालुक्यात सलग दोन तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते .अतिवृष्टीने अनेक नदी नाल्यांना पुर आला अनेक गावात पाणी शिरले तसेच नदी नाल्याच्या बाजूच्या जमीनी सह रस्ते ही खरडून गेले अनेक शेतात पाणी शिरल्याने सोयाबीन, कापूस , तुर , मुग , उडीदासह अनेक पिकाचे मोठे नुकसान झाले .झालेल्या या अतिवृष्टी मुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे .
यंदा पाऊस वेळेवर पडला नसल्याने पेरणी उशीरा सुरू झाली .पेरणी करून १५ , २० दिवस झाले पिके कोवळी असतानाच सलग दोन दिवस मोठा पाऊस झाल्याने तालुक्यात पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे .अति पावसामुळे पिकासह घराचेही नुकसान झाले .या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी जि.प.सदस्या पुनमताई पवार व तहसीलदार मंजुषा भगत यांनी शनिवारी बरबडा , पाटोदा , अंतरगाव , मनुर , कुंटूर, कोकलेगाव , छत्री शेळगाव,कुंचेली, धुप्पा आदी गावात व शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची व घराची पाहणी केले .पाहणी वेळी उपस्थित शेतक-यांना पुनमताई पवार यांनी धीर देत झालेल्या नुकसानीची माहीती आ.राजेश पवार यांना देईन व नुकसानभरपाई लवकर भेटून देण्यात येईल असे सांगत शेतकऱ्यांना धीर दिले
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या