शहीन शपाशावली उर्स निमित्त कव्वालीचा मुकाबला संपन्न !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
            शहरातील जक्कीन तलाव स्थित हजरत शहिन शफाशावली उर्स निमित्त दि.7 मार्च रोजी संदल व 8 मार्च रोजी कव्वालीचा मुकाबला कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
         संदल निमित शहरातून मिरवणूक काढण्यात आली. रात्री जक्कीन तलाव स्थित दर्गा येथे फातीहा सलाम नंतर संदल कार्यक्रमाचा समारोप झाला तर दिनांक 8 रोजी रात्री महिला कव्वाल गुलनाज निजामी (पुणे) तर पुरूष कव्वाल लुखमान ताज (आकोला)यांचा शानदार कव्वालीचा सामना झाला. या सामन्यात भक्तीगीत, गजल आदी कव्वाली गाऊन उपस्थित रसीक भक्ताना मंत्रमुग्ध केले.
यावेळी सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत कासले,पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले, मुजावर जमाल सहाब पत्रकार मोहम्मद अफजल, माजीद नांदेडकर, पो.काॅ.ईद्रीस बेग, अलीम शेख आदींनी दर्गावर चादर चढविली तद्नंतर उपस्थित मान्यवारांचा दर्गा समितीचा वतीने सत्कार करण्यात आले.
          हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीजमाल साब मुजावर शहिन शपाशावली दर्गा व उर्स समिती अध्यक्ष शेख जावेद, उपाध्यक्ष सय्यद अशरफ अहमद पाशा, सदस्य शेख आशपाक अहमद, शेख इस्माईल (मन्नुमिया)शेख सौलानी, शेख जब्बार, शेख सरवर, शेख अदिल, शेख तनवीर, शेख मुजाहिद, शेख वाजिद, इलियास पठाण, शेख वहाब आदीनी परिश्रम घेतले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या