राधेश्याम प्रतिष्ठान च्या वतिने सौ.किस्किंदाताई पांचाळ यांचा नांदेड शहरात भव्य सत्कार !

(विषेश प्रतिनिधी – शिवानंद पांचाळ नायगांवकर)दि.२० जुन नांदेड –
महाराष्ट्र राज्यातील विश्वकर्मिय समाजाच्या रणरागिनी विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ. किस्किंदाताई पांचाळ ह्या नांदेड दौऱ्यावर आल्या आसता समाज बांधवाच्या भेटी घेतल्या यावेळी राधेश्याम प्रतिष्ठान च्या वतिने त्यांचा व भव्य सत्कार करण्यात याला.
या वेळी सामाजिक विषयावर सखोल अशी चर्चा करण्यात आली .किस्किंदाताई पांचाळ यांनी कोरोणा महामारित स्वताच्या अंगावरील दागिने गहान ठेऊन सलग 20 दिवस दररोज स्वतःच्या हाताने जेवण तयार करून तीनशे ते साडेतीनशे लोकांना लोकांमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जेवनाचे डबे स्वतः पुरवत होत्या त्यांच्या या उल्लेखनीय महान कार्याची सगळी कडे कौतुक होत आहे त्यांच्या या कार्यास पुण्याचे काम युवक मंडळींनी केली महिला जरी जेवण तयार करून देत असल्या तरी जेवण डबे भरून भुकेलेल्या लोकांपर्यंत पोहोच करण्याचे काम युवक मंडळी करत होते.
दररोज 20 ते 25 लोक हे सेवाभाव म्हणून काम करत होते. तर काही तुटपुंज्या पगारावर काम करत होते. अंगावरचे दागिने गहाण ठेवून या उपक्रमास सुरुवात केली असताना नांदेड दौऱ्यावर सौ.किस्किंदाताई पांचाळ आलेल्या समजताच राधेश्याम प्रतिष्ठान दिग्रस खुर्द चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री नारायण पांचाळ, यांनी भेट घेऊन त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या व संस्थेच्या वतिने सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितीत विश्वकर्मा वंशिय समाज संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष पांडुरंग पांचाळ,आमदुरेकर, विश्वकर्मा वंशिय समाज संघटनेच्या महिला आघाडी नांदेड जिल्हा संम्पर्क प्रमुख सौ.सिमा वाकडे, माजी जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सौ.सुरेखा पांचाळ ,नांदेड जिल्हा कोषाध्यक्ष दत्ताजी तामसकर , जिल्हाउपाध्यक्ष मुरलीधर कउटकर , प्रभाकर पांचाळ ,स्वप्निल पांचाळ ,जंयवत पांचाळ बाचोटीकर, त्यांचे सहकारी यांचेही यावेळी हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला वशिष्ठ साबळे, संतोष कानडे, दिगंबर पांचाळ, आदि बांधव उपस्थितीत होते.

ताज्या बातम्या