जेष्ठ समाजसेवक श्री शंकरराव भिकु बेटकर यांना रायगड भूषण पुरस्कार प्राप्त !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी –  प्रा.अंगद कांबळे ]
        म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भापट या गावचे जेष्ठ समाजसेवक श्री शंकरराव भिकु बेटकर यांना रायगड जिल्हा परिषद तर्फे सन २०२१ चा ” रायगड भूषण पुरस्कार” नाट्यगृह पी.एन.पी. अलिबाग अॅड नाना लिमये रंगमंच येथे रविवार ६ मार्च २०२२ रोजी पार पडला.
यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती ताई तटकरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी मॅडम, आ. बाळाराम पाटील माजी मंत्री मिनाक्षी पाटील उपाध्यक्ष सुधाकर घारे माजी मंत्री पंडितशेठ पाटील समाजनेते जे.एम म्हात्रे,कृषी संवर्धन सभापती बबन मनवे, समाजकल्याण सभापती गिताताई जाधव ,जिल्हा परिषद सदस्या पाटील म्हसळा पंचायत समिती सभापती छाया म्हात्रे उपसभापती मधुकर गायकर, पं स सदस्य संदिप चाचले , सदस्या सावंत मॅडम कुणबी समाज तालुका अध्यक्ष महादेव पाटिल, उपाध्यक्ष रामचंद्र बोर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सन्मानिय शंकर बेटकर यांनी म्हसळा तालुक्यातील भापट – कोळवट या पंचक्रोशीत सुरुवात सन १९८०- ८१ पासून केली. ग्रामिण ठिकाणी गावचे कार्य पाहत असता, त्यांनी गृप ग्राम पंचायत कोळवट चे १५ वर्ष सरपंच पदावर काम केले. कुणबी समाज दक्षिण विभाग ग्रामिण म्हसळा तालुका या कमेटीवर १५ वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहिले, कुणबी समाज म्हसळा तालुका- न्यायदान कमेटीवर १० वर्ष धूरा सांभाळली. कुणबी बिगरशेती पतसंस्था म्हसळा या संस्थेवर व्हाईस चेअरमन आणि संचालक म्हणून काम केले. सदर म्हसळा तालुका कुणबी समाज या कमेटीवर सल्लागार या पदावर कार्यरत आहेत.‌
आपल्या पंचक्रोशीसह वीस गावांमध्ये टेलिफोन ची सुविधा व्हावी यासाठी बी.एस.एन.एल कंपनीकडे पाठपुरावा करून लॅन्डलाईनची जनतेसाठी सुविधा केली व भापट येथे टेलिफोन एक्सचेंज केंद्र उभे राहिले. तसेच समाजामध्ये विविध पारंपरिक चालीरीती बंद करून नविन पध्दती रूढ कराव्यात यासाठी वेळोवेळी पुढाकार घेऊन समाजाला मार्गदर्शन केले. नेहमी सांस्कृतिक, कला, क्रिडा, धार्मिक, आध्यत्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. साने गुरुजी बालभवन वाचनालय उभं करण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य केले.
त्याचबरोबर या मागील सामाजिक मिळेलेले पूरस्कार व गौरव. शामराव पेजे कृषीरत्न पूरस्कार,स्व. गणपत कातकर जेष्ठ समाजसेवक पूरस्कार, कुणबी समाज ठाकरोळी विभाग मुंबई यांच्या वतीने समाज गौरव पुरस्कार, अशा विविध ठिकाणी केलेल्या समाज उपयोगी योगदानाबद्दल शंकर भिकु बेटकर यांना गौरविण्यात आले आहे.
रायगड भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याने कुणबी समाज ठाकरोळी विभाग मुंबई, कुणबी समाज दक्षिण विभाग ग्रामिण , ग्रामस्थ मंडळ भापट मुंबई- ग्रामिण, संघर्ष युवा बौध्दजन मंडळ भापट मुंबई, उत्कृष्ट महिला मंडळ व रमाई महिला मंडळ भापट, नवयुवक विकास मंडळ भापट ,ओम शिव सत्य क्रिकेट संघ भापट यांनी तसेच समाज बांधव, हितचिंतक, युवक प्रत्यक्ष आणि फोनद्वारे संपर्क करून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या