म्हसळा तालुका सरपंच संगटनेच्या मागणी संदर्भात मा.ना.हसन मुश्रीफ महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री यांना निवेदन !
( रायगड /म्हसळा ता.प्रतिनीधी प्रा.अंगद कांबळे )
पंचायत समिती म्हसळा च्या नवीन वास्तू च्या उदघाटना निमित्य मा.ना.हसनजी मुश्रीफ साहेब (ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य) आले असता सरपंच तालुका संगठने च्या वतीने आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील सर्व सरपंच एकत्रित येण्यासाठी त्यांना व्यासपिठाची किंवा एक वेगळे स्वतंत्र दालन असावे जेणे करून त्याना हक्काचे ठिकाण मिळेल.ज्याच्या माध्यमांतून सरपंचाचे जे काही प्रश्न असतील किंवा आपली ग्रामपंचायतीला सरपंच या नात्याने लोकांची सेवा कशी सुरळीत पार पाडता येईल. तालुकयातील सर्व सरपंच एकत्रित येऊन कौशल्य विकासासाठी सरपंच भवन उपलब्ध करून दयावे.
ग्रामपंचायतीचे पथदिवे चे वीज बिल पूर्वी शासन भरत होते पण आता ते बंद करण्यात आले आहे. ते पुन्हा चालू करावे व पथ दिव्याची वीज बिल शासनाने त्वरित भरावे अश्या मागणीचे निवेदन सरपंच तालुका संघटनेचे सर्व पदधिकारी यांनी दिले मंत्री महोदयांना दिले.